शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

‘निसर्गाकडे चला’ संदेशासाठी सायकल फेरी

By admin | Updated: December 26, 2014 23:46 IST

तीन दिवसीय आयोजन. या फेरीत श्रमदानाच्या माध्यमातून रानमोडी तणाचे उच्चाटन करण्यात येणार

कोल्हापूर : निसर्गमित्र संघटना, राजाराम महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच इतर निसर्ग संस्थांच्यावतीने नववर्षानिमित्त ३० डिसेंबर ते १ जानेवारी यादरम्यान ‘निसर्गाकडे चला’ असा संदेश देत तीन दिवसीय सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीत श्रमदानाच्या माध्यमातून रानमोडी तणाचे उच्चाटन करण्यात येणार आहे. ‘निसर्गमित्र’चे अध्यक्ष मधुकर बाचूळकर व प्रकल्प संयोजक दिनकर चौगुले यांनी ही माहिती दिली.  कोल्हापूर ते पन्हाळा या मार्गावर तालुक्यातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळा, ग्रामपंचायत, तरुण मंडळे, महिला बचत गट यांच्यामध्ये पर्यावरण जागृती विषयी कृतिशील प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील शेती व सह्याद्रीच्या जंगलसंपदेवर अतिक्रमण करणाऱ्या रानमोडी नावाच्या तणाची माहिती विद्यार्थी व ग्रामस्थांना देण्यात येईल. त्याचबरोबर पर्यावरणपूरक जीवनशैली, दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याच्या दृष्टिकोनातून पाणी वाचवूया, स्थानिक प्रजातीचे वृक्ष लावूया, कचऱ्यापासून खत व गॅस निर्माण करूया, सौरऊर्जेचा वापर करून विजेचा वापर जपून करूया, व्यसनापासून दूर राहूया, आदी विषयांची चर्चा व तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ मंगळवारी (दि. ३० डिसेंबर) दुपारी साडेचार वाजता शाहू मिलसमोरच्या प्रांगणात होणार आहे. तरी महाविद्यालयाचे विद्यार्थी व निसर्गप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)