शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

‘भोगावती’ बिनविरोधसाठी ‘ए. वाय.’ यांचा पुढाकार

By admin | Updated: March 21, 2016 00:38 IST

सर्वांशी चर्चेची तयारी : जिल्हा बँक, विधानसभेच्या राजकारणाची किनार

राजाराम लोंढे -- कोल्हापूर --परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी हालचाली गतिमान केल्या असून, काँग्रेससह कारखान्यांशी संबंधित सर्वच घटकांशी चर्चा करण्याची तयारी त्यांनी केली आहे. ‘भोगावती’ करवीर व राधानगरी विधानसभा मतदारसंघांतील राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. येथे गेली अनेक वर्षे काँग्रेसविरोधात शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस असाच सामना पाहावयास मिळत आहे. गतनिवडणुकीत राष्ट्रवादी व ‘शेकाप’ने एकत्रित येत आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह इतर पक्षांची मदत घेत काँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लावला होता. गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला विरोध करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडलेली नाही. वाढीव सभासद, कारखान्याचा कारभार व प्रशासक नियुक्तीबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यात भोगावती शिक्षण मंडळाच्या वादामुळे दोन्ही काँग्रेसमधील संबंध टोकाला गेले असतानाही साखर उद्योगासमोरील अडचणी, केंद्र व राज्य सरकारचे धोरण पाहता दोन्ही काँग्रेसमधील वाद संपवून निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रयत्न ‘ए. वाय.’ यांचा आहे. कारखान्याच्या राजकारणांत दोन्ही काँग्रेसचे ताणलेले संबंध पाहता, बिनविरोध निवडणूक अशक्य वाटत असली, तरी यास जिल्हा बँकेच्या राजकारणाची किनार या घडामोडी आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘ए.वाय.’ यांना राधानगरीतून बिनविरोध करण्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे योगदान फार मोठे आहे. करवीरमधून ‘पी.एन.’ यांना बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेत चंद्रदीप नरके यांची समजूत काढली होती. दोन्ही कॉँग्रेसचे जरी मिटले तरी ‘शेकाप’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एकंदरीत ‘बिनविरोध’साठी अडचणी अधिक असल्या तरी सर्वच नेत्यांनी मनावर घेतले तर अशक्यही नाही. विधानसभेचा अनुभव पाठीशी!काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा फायदा झाला. ‘करवीर’मध्ये राष्ट्रवादीच्या सहकार्याने चंद्रदीप नरके पुन्हा आमदार झाले तर राधानगरीमध्ये काँग्रेसच्या सहकार्याने प्रकाश आबीटकर यशस्वी झाले; पण आता दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांना या चुका कळल्याने ‘भोगावती’मध्ये तडजोड करावी, असा मतप्रवाह दोन्ही काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांचा आहे. सरकारच्या धोरणाने साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत संस्था वाचविण्यासाठी सर्व मतभेद विसरून बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. काँग्रेस, शेकाप, शिवसेनेसह सर्वच घटकांशी चर्चा करून प्रस्ताव देणार आहे. जिल्हा बँक बिनविरोध झाल्याने आपल्यावरील जबाबदारी वाढली असून, जागा किती मिळणार हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. - ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया ठरलेली असते. ‘गोड’ साखर कारखान्यासाठी पाचशे अर्ज दाखल झाले, हा अनुभव पाठीशी असताना बिनविरोध करतो म्हणणे सोपे नाही; पण कारखान्याच्या हितासाठी तशी परिस्थिती निर्माण झाली तर ‘शेकाप’ त्यात सहभागी होईल. - संपतराव पवार, माजी आमदारगेल्या सहा वर्षांतील कारभार व कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता ‘भोगावती’ ला चांगल्या प्रशासनाची गरज आहे. बिनविरोध अथवा निवडणुकीबाबत सभासदांना विश्वासात घेतल्याशिवाय बोलणे उचित ठरणार नाही. - उदयसिंह पाटील-कौलवकर, नेते, काँग्रेस