भोगावती : परिते (ता.करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाला ऊसाला राज्यात सर्वाधिक ३ हजार ६५३ रुपये मे.टन अंतिम ऊस दराची घोषणा करत, आज (शुक्रवार) पासून गळीत हंगामाला सुरुवात करत असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव पाटील आणि संचालक मंडळाने पत्रकार बैठकीत दिली.अध्यक्ष पाटील म्हणाले, कारखान्याची आर्थिक परिस्थिती धोकादायक असताना देखील शेतकऱ्यांचे हित डोळयांसमोर ठेवून सध्याच्या बाजारभाव, उत्पादन खर्च व साखरेच्या दरांचा विचार करून आम्ही योग्य आणि समाधानकारक असा दर निश्चित केला आहे. कारखाना वेळेवर सुरू करून शेतकऱ्यांच्या ऊसाचे लवकर गाळप व्हावे, यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आज शुक्रवारपासून गळीत हंगामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले.गेल्या गळीत हंगामात चार लाख २१ हजार ७८८ मॅट्रिक टन ऊसाचे गाळप करून पाच लाख ३७ हजार ८७० लाख साखर होती. उत्पादित करत १२.७५ साखर उतारा मिळवला होता. त्या आधारे या हंगामात एफआरपी रक्कम तीन हजार ६५२ रुपये ६० पैसे एवढी पडत आहे. यामध्ये ४० पैसे वाढ करत ३ हजार ६५३ रुपये अंतिम ऊस देणार असल्याची सांगितले. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक सागर पाटील, शेती अधिकारी सातापा चरापले, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते.
Web Summary : Bhogaavati Sugar Mill declared the highest sugarcane rate of ₹3,653 per ton. The crushing season starts tomorrow, prioritizing farmers' interests despite financial challenges. The mill aims for efficient sugarcane processing, building on last season's production of 537,870 lakh sugar with a 12.75% recovery rate.
Web Summary : भोगावती चीनी मिल ने ₹3,653 प्रति टन की उच्चतम गन्ना दर घोषित की। पेराई सत्र कल से शुरू हो रहा है, वित्तीय चुनौतियों के बावजूद किसानों के हितों को प्राथमिकता दी जा रही है। मिल का लक्ष्य कुशल गन्ना प्रसंस्करण है, जो पिछले सीजन में 12.75% की वसूली दर के साथ 537,870 लाख चीनी के उत्पादन पर आधारित है।