भोगावती : भोगावती महाविद्यालयात कॉँग्रेस प्रणित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रा. ए. डी. चौगले आणि प्राचार्य डॉ. दिनकर पाटील यांनी उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक यांच्याकडून मिळालेल्या वेतनेतर अनुदान रकमेत चार कोटी सहा लाख ७८ हजार रुपयांचा संगनमताने ढपला पाडला आहे. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भोगावती कारखाना प्रणित शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे, उपाध्यक्ष बबन पाटील अािण संचालक अरुण सोनाळकर यांनी आज, शुक्रवारी पत्रकार बैठकीत केली.पत्रकार बैठकीत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन १२/१३ साली १ कोटी ६३ लाख ६९ हजार ५९४ रुपयांपैकी १ कोटी १३ लाख २५ हजार ५८८ इतकी रक्कम सहावा वेतन आयोगाचा फरक दिला, असे दाखवले आहे. मात्र, १३/१४ साली खर्च होणार असल्याने वसूलपात्र रक्कम ५० लाख ४४ हजार ६ रुपये आहे, असे म्हणून युजीसी अनुदानातही या दोघांनी ढपला पाडला आहे, असा आरोप अध्यक्ष हुजरे आणि सोनाळकर यांनी केला आहे. यावेळी शिक्षण मंडळाचे संचालक, कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)कोणत्याही चौकशीस तयार : चौगलेयावेळी अध्यक्ष प्रा. ए. डी. चौगले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सन २००२ पासून वेतनेतर अनुदान मिळाले नाही. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत. याबाबत आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. वेतनेतरचा भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास आमच्यावर कोणत्याही स्वरूपाची कारवाई व्हावी. मात्र, ती सिद्ध न झाल्यास तुमच्यावर फौजदारी दाखल करून कायदेशीर कारवाई करू.
भोगावती महाविद्यालयात वेतनेतर अनुदानात ढपला
By admin | Updated: January 17, 2015 00:27 IST