शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जन्मापासून अंथरुणावर खिळून असलेल्या प्रथमेशची भरारी, दहावीत ८० टक्के गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 18:47 IST

जन्मल्यापासून तो सेरेब्रल पाल्सी या विकाराने त्रस्त आहे. त्यामुळे तेव्हापासूनच अंथरुणावर खिळून असतानाही दहावीच्या परीक्षेत स्वत:ची जिद्द व आईवडिलांच्या प्रयत्नांमुळे प्रथमेश दत्तात्रय वाले या विद्यार्थ्याने लखलखीत यश मिळविले. त्याला दहावीत ७९.४० टक्के गुण मिळाले आहेत.

ठळक मुद्देजन्मापासून अंथरुणावर खिळून असलेल्या प्रथमेशची भरारी, दहावीत ८० टक्के गुणघरगुती वायरिंग करून वडिलांनी मुलाला घडविले

कोल्हापूर : जन्मल्यापासून तो सेरेब्रल पाल्सी या विकाराने त्रस्त आहे. त्यामुळे तेव्हापासूनच अंथरुणावर खिळून असतानाही दहावीच्या परीक्षेत स्वत:ची जिद्द व आईवडिलांच्या प्रयत्नांमुळे प्रथमेश दत्तात्रय वाले या विद्यार्थ्याने लखलखीत यश मिळविले. त्याला दहावीत ७९.४० टक्के गुण मिळाले आहेत.

उत्तम शिक्षण घेऊन त्याने स्वावलंबी जीवन जगावे, अशी अपेक्षा त्याच्या पालकांनी व्यक्त केली आहे. तो जुन्या मोरे कॉलनीतील सोमराज कॉम्प्लेक्समध्ये राहतो. निकाल ऐकल्यानंतर प्रथमेश कमालीचा आनंदित झाला.आयुष्यात कशातही थोडे अपयश आले तर नैराश्यातून चुकीच्या वाट चोखाळणाऱ्यांना प्रथमेशचे आयुष्य प्रेरणादायी आहे. त्याला आजही अंथरुणावरून उठून बसवावे लागते. त्याचे वडील घरगुती वायरिंगचा व्यवसाय करतात. कामाचा रोजचा व्याप सांभाळून ते रोज त्याला गाडीवरून शाळेत सोडत होते.

आई दुपारी जाऊन त्याचे नैसर्गिक विधी आवरून येत असे. परत सायंकाळी जाऊन त्याला गाडीवरून घरी आणावे लागे. परंतु हे करताना आई स्वप्ना यांच्यासह वाले कुटुंबीयांना त्याचे कधीच ओझे वाटले नाही. त्यांचे कुटुंब मोठे आहे, सर्वांचा मोठा आधार असल्याने प्रत्येकानेच प्रथमेशला फुलू देण्यास मदत केली. त्यांचा कोणताही घरगुती समारंभ असो; त्यात प्रथमेश नाही असे कधीच झाले नाही. त्यामुळेच त्याची जडणघडण चांगली झाली आहे. त्याच्या यशाचे गमक त्यामध्येच आहे.

प्रथमेशचा शाळेतही मित्रपरिवार आहे. त्यांना आपल्या निकालापेक्षा प्रथमेशच्या यशाचा आनंद जास्त वाटला. वर्गशिक्षक बी. एम. फडतरे, मुख्याध्यापक भीमराव गोसावी यांच्यासह शाळेतील शिपायांपासून सर्वांनीच त्याच्या शिक्षणासाठी सहकार्य केले; त्यामुळेच त्याची धडपड कारणी लागल्याची भावना वडिलांनी बोलून दाखवली. प्रथमेश विद्यापीठ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे.तीन शस्त्रक्रियाप्रथमेशच्या आतापर्यंत मोठ्या तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दहावी परीक्षेच्या तोंडावरच तो कॉटवरून खाली पडला आणि उजवा पाय मांडीतूनच मोडला. तशाही अवस्थेत त्याने अभ्यास केला व लेखनिक घेऊन परीक्षा दिली.

प्रथमेशच्या पालकांनी सुरुवातीपासूनच त्याच्यावर चांगले उपचार होतील यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी महिन्याकाठी त्यांना किमान पंधरा हजार रुपये खर्च येत असे; परंतु मुलगा चांगला व्हावा यासाठी त्यांनी हा खर्च केला आहे. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालkolhapurकोल्हापूरDivyangदिव्यांग