शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘भाऊ नाईक’च्या दहीहंडीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशभक्तिपर गीते आणि उपस्थितांचा श्वास रोखून धरणारा थरार अशा चैतन्यमयी वातावरणात गंगावेशीतील भाऊ नाईक गल्ली सांस्कृतिक मंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान दुसºयांदा राशिवडेच्या रासलिंग गोविंद पथकास बुधवारी रात्री मिळाला.या उत्सवासाठी रासलिंग गोविंदा पथक (राशिवडे),गोडीविहीर, अजिंक्यतारा गोविंदा पथक (दोघेही शिरोळ) यांनी नोंदणी केली होती. रात्री साडेदहापर्यंत एकही पथक ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : देशभक्तिपर गीते आणि उपस्थितांचा श्वास रोखून धरणारा थरार अशा चैतन्यमयी वातावरणात गंगावेशीतील भाऊ नाईक गल्ली सांस्कृतिक मंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान दुसºयांदा राशिवडेच्या रासलिंग गोविंद पथकास बुधवारी रात्री मिळाला.या उत्सवासाठी रासलिंग गोविंदा पथक (राशिवडे),गोडीविहीर, अजिंक्यतारा गोविंदा पथक (दोघेही शिरोळ) यांनी नोंदणी केली होती. रात्री साडेदहापर्यंत एकही पथक ही दहीहंडी फोडण्यासाठी आले नव्हते. अखेर रात्री १०.४०च्या सुमारास रासलिंग गोविंदा पथक दाखल झाले. यावेळी या पथकाने पहिला प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर लगेचच दुसºया प्रयत्नात ‘रासलिंग’च्या गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडली. त्यामुळे यंदाचा दहीहंडी फोडण्याचा मान राशिवडेच्या रासलिंग पथकास मिळाला. या पथकास २५ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात आले. यंदाचे आकर्षण ठरलेल्या मुंबईच्या नटराज गु्रपच्या कलाकारांनी प्रथम देशभक्तिपर गीते सादर केली. यासह लावणी, दहीहंडी गीते सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो आबालवृद्धांनी गर्दी केली होती. आसपासच्या परिसरातील अनेक इमारतींवरूनही अनेकांनी दहीहंडी पाहण्याचा आनंद घेतला. दहीहंडीचे पूजन विवेक महाडिक, नगरसेवक शेखर कुसाळे, प्रतापसिंह जाधव यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष निरंजन हुंडेकरी, राजेंद्र चव्हाण, अमोल गायकवाड, राहुल ससे, संभाजी भोसले, चेतन काळे, विक्रम खोत, तुषार दळवी, आदी उपस्थित होते.