शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’ शाखेचे व्यवस्थापक देवर्डेकर निलंबित : शेतकरी संघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 17:00 IST

शेतकरी सहकारी संघाच्या भोगावती शाखेचे व्यवस्थापक देवर्डेकर यांना व्यवस्थापनाने निलंबित केले. एका खासगी कंपनीला संचालक मंडळाची परवानगी न घेता परस्पर डिझेलची विक्री केल्याने ही कारवाई करण्यात आली. शिरोळ शाखेतही खत विक्रीचा असाच प्रकार घडला होता, तोपर्यंत या शाखेत प्रकार घडल्याने संघाची तपासणी यंत्रणा नेमकी काय करते? असा प्रश्न सभासदांतून विचारला जात आहे.

ठळक मुद्दे‘भोगावती’ शाखेचे व्यवस्थापक देवर्डेकर निलंबित : शेतकरी संघ १८ लाखांची उधारीवर डिझेल विक्री भोवली

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या भोगावती शाखेचे व्यवस्थापक देवर्डेकर यांना व्यवस्थापनाने निलंबित केले. एका खासगी कंपनीला संचालक मंडळाची परवानगी न घेता परस्पर डिझेलची विक्री केल्याने ही कारवाई करण्यात आली. शिरोळ शाखेतही खत विक्रीचा असाच प्रकार घडला होता, तोपर्यंत या शाखेत प्रकार घडल्याने संघाची तपासणी यंत्रणा नेमकी काय करते? असा प्रश्न सभासदांतून विचारला जात आहे.गेल्या वर्षभरात संघाच्या विविध शाखांत अपहाराचे प्रकार उघडकीस आले. चार-पाच महिन्यांपूर्वी शिरोळ शाखेत व्यवस्थापकांसह तेथील यंत्रणेने खताची कर्नाटकात विक्री केल्याचे दाखवून तब्बल ३९ लाखांचा अपहार केला होता. निरीक्षक व मुख्य व्यवस्थापक दर महिन्याला स्टॉक तपासत असताना उधारीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात मालाची विक्री होतेच कशी? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झाला होता. हे प्रकरण अद्याप ताजे असताना संघाच्या भोगावती शाखेत उधारीवर माल विक्रीचे प्रकरण पुढे आले आहे.

वास्तविक डिझेल व पेट्रोल उधारीवर विक्री करायची नाही, हे संघाचे धोरण असताना त्याला बाजूला सारत तेथील व्यवस्थापक देवर्डेकर यांनी तब्बल १८ लाखांचे डिझेल एका खासगी कंपनीस विक्री केले आहे. ही कंपनी तेथील कारखान्याची डिस्टलरी प्रकल्प चालवित आहे. या कंपनीस उधारीवर डिझेल दिले असून, गेली पाच-सहा महिने एक रुपयाही कंपनीने संघास दिलेला नाही.वास्तविक उधारीवर विक्री करायची नाही, हे संघाचे धोरण होते. संघाची यंत्रणा दर महिन्याला माल खरेदी व विक्रीचा ठोकताळा घेते. मग ही उधारी संबंधित यंत्रणेला कशी दिसली नाही. हाच प्रश्न पुन्हा उपस्थित होत असून, या सगळ्या प्रकरणात संपूर्ण यंत्रणाच सहभागी आहे की काय? अशी विचारणा सभासदांमधून होत आहे.

भोगावती शाखेत देवर्डेकरांनी संचालक मंडळाची मंजुरी न घेताच उधारीवर डिझेलची विक्री केली. त्याबद्दल त्यांना निलंबित केले असून, संबंधित कंपनीने १८ लाख अधिक व्याज देण्याची तयारी दर्शविली आहे.- अमरसिंह माने,अध्यक्ष, शेतकरी संघ 

 

टॅग्स :Dieselडिझेलkolhapurकोल्हापूर