सडोली (खालसा)
: ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’ या गजरात, गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत हळदी (ता. करवीर) येथील भद्रकाली देवीची अंबिल यात्रा कोरोनोच्या नियमांचे कठोर पालन करत मोजक्याच मानकरी व भाविकांच्या उपस्थित मोठ्या भक्तिभावाने अत्यंत साध्या पद्धतीने पार पडली.
पहाटे पाच वाजता उपसरपंच बाजीराव पाटील नंदकुमार स्वामी व यात्रा कमिटीचे मोजकेच सदस्य यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तसेच पालखी सोहळा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडला
कोरानाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व यात्रांवर कठोर निर्बंध घातले असून, हळदी, ता. करवीर येथील ग्रामदैवत असणाऱ्या भद्रकाली देवीच्या अंबिल यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने यात्रा कमिटीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
मंदिरातील सर्व धार्मिक विधी मानकरी व यात्रा कमिटीचे मोजक्या सदस्यांच्या हस्ते संपन्न झाले.