शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भडगावच्या शिक्षकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:18 IST

सावंतवाडी/ गडहिंग्लज : आंबोली तील कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत शनिवारी सापडलेला मृतदेह विजयकुमार अप्पय्या गुरव (रा. भडगाव पैकी चोथेवाडी, ता. गडहिंग्लज) यांचा असल्याचे व त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. गुरव यांचा मुलगा अभिषेक याने रविवारी रात्री मृतदेह ओळखला.दरम्यान, डीएनए चाचणी केल्यानंतरच मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट ...

सावंतवाडी/ गडहिंग्लज : आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथील दरीत शनिवारी सापडलेला मृतदेह विजयकुमार अप्पय्या गुरव (रा. भडगाव पैकी चोथेवाडी, ता. गडहिंग्लज) यांचा असल्याचे व त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. गुरव यांचा मुलगा अभिषेक याने रविवारी रात्री मृतदेह ओळखला.दरम्यान, डीएनए चाचणी केल्यानंतरच मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. आंबोलीतील कावळेसाद पॉर्इंट येथील खोल दरीत शनिवारी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे डोके छिन्नविछिन्न अवस्थेत होते. तसेच पूर्ण शरीर सडलेले असल्याने मृतदेह ओळखता येत नव्हता. रविवारी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर भडगाव येथील गुरव कुटुंबीय सावंतवाडीत दाखल झाले. त्यानंतर त्यांना ओरोस येथे ज्या ठिकाणी मृतदेह ठेवण्यात आला होता, तेथे नेऊन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने ओळख पटविण्यात यश येत नव्हते. तसेच ओळख पटवण्यासारखे काहीच नव्हते. फक्त हातात एक दोरा होता, तोही ओळखता येत नव्हता. त्यामुळे ओरोस येथे गेलेले त्यांचे नातेवाईक व मुलगा पुन्हा रात्री उशिरा सावंतवाडीत दाखल झाले.त्यांनी याबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना काही छायाचित्रे दाखविण्यात आली. त्या छायाचित्रांवरून हा मृतदेह आपल्याच वडिलांचा असल्याचे त्यांचा मुलगा अनिकेत गुरव याने मान्य केले. आपल्या वडिलांच्या पायाची बोटे तसेच हातात असलेला दोरा यावरून हा मृतदेह वडिलांचाच आहे, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी हा मृतदेह तत्काळ आपल्या ताब्यात देता येणार नाही, असे स्पष्ट केले. मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. याला आठ दिवसांचा कालावधी जाणार असून, त्यात मृतदेहाची ओळख पटली तर मृतदेह तुमच्या ताब्यात दिला जाईल, असे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी सांगितले. त्यामुळे गुरव यांचे नातेवाईक पुन्हा गडहिंग्लजकडे रवाना झाले.दरम्यान, गुरव यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मृत शिक्षक विजयकुमार गुरव हे भडगाव येथील राहणारे आहेत. तर ते हिडदुगी येथील हिडदुगी हायस्कूलमध्ये गणित हा विषय शिकवत होते. सहा वर्षांपासून ते या शाळेत कार्यरत होते. मात्र आतापर्यंत त्यांचे कोणाशी भांडण नव्हते. आपले काम आणि आपण अशा स्वभावाची ही व्यक्ती असल्याचे त्यांच्या सोबतच्या शिक्षकांनी सांगितले. अनिकेत याने आपले वडील सोमवारी ६ नोव्हेंबरला रात्री ११ च्या सुमारास घरातून जाऊन येतो असे सांगून निघून गेले ते आलेच नाहीत. त्यामुळे आम्ही ८ नोव्हेंबरला गडहिंग्लज पोलीस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिल्याचे सांगितले. आम्ही अद्यापपर्यंत कोणावरही संशय व्यक्त केला नाही. तसेच ही घटना आमच्या विचार करण्याच्या पलीकडची आहे, असे अनिकेतने स्पष्ट केले आहे.हातातील दोरा ठरला महत्त्वाचा दुवाकावळेसाद पॉर्इंट येथे मिळालेला मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होता. त्यामुळे मृतदेह ओळखता येणे कठीण झाले होते. मात्र मृतदेहाचे छायाचित्र बघितले तसेच मृतदेहाच्या हातात असलेला दोरा हाच महत्त्वाचा दुवा ठरला. त्यावरून मृतदेह ओळखण्यात अनिकेत याला यश आले.६ नोव्हेंबरपासून होते बेपत्तागुरव हे भडगाव पैकी चोथेवाडी येथे त्यांच्या शेतातील घरात कुटुंबीयांसह राहत होते. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ते त्यांच्या घरातच एका मित्रासोबत गप्पा मारत बसले होते. तो निघून गेल्यानंतर अकराच्या सुमारास ते बाहेर जाऊन येतो म्हणून निघून गेल्याचे समजते; पण ते कुणासोबत गेले हे त्यांच्या कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहिले नाही. गुरव यांचा मुलगा अनुपच्या वदीर्नुसार ते बेपत्ता झाल्याची नोंद गडहिंग्लज पोलिसांत करण्यात आली आहे. ते हिडदुग्गी हायस्कूल येथे १९९५ पासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.सहलीच्या अठ्ठावीस हजारांबरोबरच दागिने गायबविजयकुमार गुरव यांच्याकडे शाळेच्या सहलीचे अठ्ठावीस हजार रुपये गोळा करून ठेवण्यास दिले होते. तसेच त्यांच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोनेही होते. त्यामुळे हा खून पैसे व दागिन्यांच्या हव्यासापोटी करण्यात आला आहे का, याची माहिती पोलीस घेत आहेत. त्यांच्यासोबत सोमवारी दिवसभर कोण होते तसेच त्यांना शेवटचा फोन कोणाचा आला होता, याचीही माहिती पोलीस घेत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा