शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

महापूरबाधित शेतकऱ्यांनाही व्याज सवलतीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 11:36 IST

Banking sector KolhapurNews- कोल्हापूर जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टी व महापुरातील बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देणार नसल्याचे शासनाने सांगितले होते. कर्जमाफीच्या वरील रकमेची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ठळक मुद्देमहापूरबाधित शेतकऱ्यांनाही व्याज सवलतीचा लाभ जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर : जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट २०१९ मध्ये अतिवृष्टी व महापुरातील बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देणार नसल्याचे शासनाने सांगितले होते. कर्जमाफीच्या वरील रकमेची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.जिल्हा बँकेच्या कार्यकारी समितीची सोमवारी बैठक झाली. यामध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. महापुरातील बाधित ९२ हजार २०१ शेतकऱ्यांना २६८ कोटींची कर्जमाफी राज्य शासनाने दिली आहे. या कर्जमाफी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे सरकारने जाहीर केले होते.

ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी योजनेचा लाभ मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी उर्वरित पीक कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड केली होती. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रोत्साहनपर तीन टक्के व्याज परतावा योजनेप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देणे आवश्यक असल्याबाबत बँकेच्या ३१ ऑक्टोबर २०२० च्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव केला होता. त्याचबरोबर सर्वसाधारण सभेतही याबाबत ठराव झाला होता. बँकेच्या पाठपुराव्यानंतर सरकारने अंशत: कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर