शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावचे मराठी नगरसेवक डरपोक : एन. डी. पाटील

By admin | Updated: November 23, 2014 00:36 IST

मराठी भाषिकांच्या भावनेशी प्रतारणा

कोल्हापूर : सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. साक्षी नोंदण्याच्या टप्प्यात खटला पोहोचला आहे. अशावेळी कर्नाटक शासन कारवाई करेल या भीतीपोटी बहुसंख्य मराठी भाषिकांच्या भावनेशी प्रतारणा बेळगावचे मराठी भाषिक महापौर, उपमहापौर, नगरसेवक करीत आहेत. ते डरपोक आहेत. त्यांच्या या कृतीचा खटल्यावर काहीही परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात कोल्हापूरच्या टोलप्रश्नी आयोजित बैठकीनंतर पत्रकारांनी बेळगावातील मराठी नगरसेवकांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले. यावर पाटील बोलत होते. ते म्हणाले, अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी विविध मार्गाने लढा देत आहेत. सध्या सीमा खटल्यातील साक्षी नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशावेळी मराठी भाषिक महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांनी १ नाव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनात सहभागी झाले नाहीत. बरखास्तीच्या भीतीने महानगरपालिकेत सीमा प्रश्नाचा ठराव करण्याची परंपरा खंडित केली. यावरून नगरसेवकांना सीमाप्रश्नासंबंधी फारसे गांभीर्य नाही, हे स्पष्ट होते. ते काय भूमिका घेतात, याच्याशी आमचे काही देणे, घेणे नाही. त्यांना निवडून दिलेले मराठी भाषिक यांचा गांभीर्याने विचार करतील. त्यांचे राजकीय भवितव्य मराठी भाषिक मतदार ठरवतील; परंतु नगरसेवकांची डरपोक वृत्ती दिसून येत आहे. ते आमच्या सोबत आले काय किंवा नाही आले काय, फारसा फरक पडत नाही. त्यांना निवडून दिलेले विचार करतील. सीमा भागातील बहुसंख्य अशा मराठी भाषिकांसाठी लढा सुरू आहे.