बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे आज दुपारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि बेळगावचे खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना भाजपच्या विजयाची खात्री देऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी पुढे म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रातील विकास कामे आणि भारताची गरिमा वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याची जनतेला जाणीव असल्यामुळे आतापर्यंत आम्ही बहुतांश निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. ही पोटनिवडणूक म्हणजे एक ऐतिहासिक घटना ठरणार असून यामध्ये आमचा विजय निश्चित आहे, असे जोशी म्हणाले.
केंद्रासह राज्यातील भाजप सरकार हे अत्यंत खराब सरकार असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या करीत आहेत.