शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘आशां’चे आंदोलन मागे; राज्य शासनाकडून २०००चे मानधन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 10:24 IST

मानधनवाढीसंदर्भात आशा स्वयंसेविकांनी सुरू केलेले आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सोमवारी रात्री हॉटेल पंचशील येथे भेट होऊन सकारात्मक आश्वासन मिळाल्याने मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून दोन हजार रुपये मानधन देण्याचा शासन निर्णय सोमवारीच काढल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे‘आशां’चे आंदोलन मागे; राज्य शासनाकडून २०००चे मानधन मंजूरमुख्यमंत्र्यांनी काढला शासन निर्णय

कोल्हापूर : मानधनवाढीसंदर्भात आशा स्वयंसेविकांनी सुरू केलेले आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी सोमवारी रात्री हॉटेल पंचशील येथे भेट होऊन सकारात्मक आश्वासन मिळाल्याने मागे घेतले. मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडून दोन हजार रुपये मानधन देण्याचा शासन निर्णय सोमवारीच काढल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.मानधनवाढीसंदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले होते. रात्री ‘आशां’च्या शिष्टमंडळाला भेटीची वेळ दिली होती. तत्पूर्वी पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी आशा स्वयंसेवकांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याचे सांगितले.

राज्य शासनाकडून २००० रुपये मानधन देण्याचा शासन निर्णय त्यांनी आजच काढल्याचे आशा स्वयंसेवकांना सांगितले. मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार व आंदोलन मागे घ्यावे या आवाहनाला प्रतिसाद देत आशांनी हे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.

त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल अभिनंदन केले. त्यामध्ये पालकमंत्र्यांनीही पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. शिष्टमंडळात नेत्रदीपा पाटील, संगीता पाटील, सुप्रिया गुदले, ज्योती तावरे, सुरेखा तेरदाळे आदींचा समावेश होता. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर