याप्रसंगी दररोज पुतळ्याचे पूजन आणि पुतळा परिसराची स्वच्छता करणाऱ्या बसवराज तुरबतमठ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोरी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, राजेश बोरगावे, बसवराज खणगावे, हारुण सय्यद, उदय पाटील, नितीन देसाई, नरेंद्र भद्रापूर, उदय कदम, दीपक कुराडे, वीणा कापसे, सुनीता पाटील, शकुंतला हातरोटे, शशिकला पाटील, नाझ खलिफा, श्रद्धा शिंत्रे, सरिता भैसकर, लता पालकर, प्रकाश तेलवेकर, दिलीप माने, चंद्रकांत सावंत, बाळासाहेब भैसकर, रमेश पाटील, संजय गुरव, आदी उपस्थित होते.
-----
फोटो ओळी-
गडहिंग्लज येथे शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रारंभ माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी, हारुण सय्यद, दिलीप माने, बसवराज तुरबतमठ, आदी उपस्थित होते.