कोल्हापूर : कुष्ठरोगीबांधवांना गेल्या आठ महिन्यांपासून वैद्यकीय मानधन न दिल्याबद्दल आज, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता कुष्ठबांधवांच्यावतीने वंचित बहुजन आघाडीतर्फे कोल्हापूर महापालिकेसमोर ‘भीक मांगो आंदोलन’ केले जाणार आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून कुष्ठबांधवांना त्यांच्या आजारावरील उपचारासाठी दिले जाणारे वैद्यकीय मानधन महापालिकेकडून दिलेले नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकरिता वंचित बहुजन आघाडीतर्फे हे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे जिल्हा महासचिव डाॅ. आनंद गुरव यांनी पत्रकाद्वारे दिली.