शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या विकासासाठी एक व्हा

By admin | Updated: October 8, 2016 01:03 IST

संभाजीराजे छत्रपती : क्रिडाई कोल्हापूरच्या ‘गृह-दालन २०१६’चा उत्साहात प्रारंभ

कोल्हापूर : माझं-तुझं करण्याऐवजी राजकीय नेत्यांसह सर्वांनीच संघटित होऊन कोल्हापूरच्या विकासासाठी वेगळा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी येथे केले.क्रिडाई कोल्हापूरतर्फे आयोजित ‘गृह-दालन २०१६’ या गृहविषयक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावरील कार्यक्रमास ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे उपाध्यक्ष राजीव परीख, उद्योगपती व्ही. बी. पाटील प्रमुख उपस्थित होते. उत्साही वातावरणात ‘गृह-दालन २०१६’चा प्रारंभ झाला.खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘स्मार्ट सिटी’ योजनेमध्ये कोल्हापूरचा पहिल्याच टप्प्यात का समावेश झाला नाही, याच्या संशोधनाची आवश्यकता आहे. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, महापालिका, क्रिडाई कोल्हापूर, पर्यावरणप्रेमी, आदी घटकांनी संघटित होऊन कोल्हापूरच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूरच्या समावेशासाठी सर्व मिळून एकत्रितपणे प्रयत्न आणि आवश्यक स्वरूपातील आराखडा निश्चित करूया. गृहविषयक माहितीचे दालन कसे असावे, हे क्रिडाई कोल्हापूरने दाखवून दिले आहे.‘क्रिडाई महाराष्ट्र’चे उपाध्यक्ष परीख म्हणाले, कोल्हापूरच्या ‘इमेज ब्रॅँडिंग’ची गरज आहे. शहरवासीयांनी मानसिकता बदलल्यास चांगले अधिकारी मिळतील. या दृष्टीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन बैठक घ्यावी. बांधकाम व्यवसायाला स्थिरता आली आहे. त्याला गती देण्यासाठी गृहकर्जाचे दर कमी करणे, करसवलत देणे, आदींद्वारे सरकारने पाठबळ द्यावे. दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘गृह-दालन’द्वारे कोल्हापूरकरांना त्यांचे गृहस्वप्न साकारण्याची चांगली संधी मिळाली आहे. ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कोल्हापूरच्या बांधकाम व्यावसायिकांनी विश्वासार्हता आणि गुणवत्ता जपली आहे. त्यामुळे ‘रेरा’अंतर्गत एकही कारवाई येथे झालेली नाही. प्राधिकरणाला गती मिळावी. स्मार्ट सिटीतील समावेशासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कोल्हापूरची ओळख ही आंदोलकांचे शहर म्हणून होत आहे. ती पुसण्यासाठी ‘सिटी ब्रॅँडिंग’ची गरज असून, त्याला पाठबळ देण्याची ‘क्रिडाई कोल्हापूर’ची तयारी आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते फीत कापून ‘गृह-दालन’चे उद्घाटन करण्यात आले. यानंतर राजेश काजवे, सोपान पाटील, अमित चौगुले, मंदार आपटे, भूपेश कांजळकर, जितूभाई गांधी यांचा सत्कार करण्यात आला. ‘गृह-दालन’चे अध्यक्ष पवन जामदार यांनी प्रदर्शनाची माहिती दिली. यावेळी क्रिडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष सुजय होसमनी, सचिव विद्यानंद बेडेकर, खजानिस चेतन वसा, ‘गृह-दालन’चे खजानिस प्रकाश देवलापूरकर, सहसमन्वयक विश्वजित जाधव, संदीप मिरजकर, सचिन परांजपे, राजेश आडके, विक्रांत जाधव, प्रदीप भारमल, संग्राम दळवी, आदी उपस्थित होते. प्रदर्शनाचे समन्वयक प्रमोद साळुंखे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आत्मपरीक्षणाची गरजराजकीय नेते, लोकप्रतिनिधींसह सर्वजण राजर्षी शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांचे नाव घेतात; पण त्यांच्या विचारांप्रमाणे कोल्हापूरच्या विकासासाठी माझ्यासह आपण सर्व कार्यरत आहोत काय, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी दिल्लीत रमायचे की कोल्हापूरच्या विकासासाठी निश्चित दिशा ठरवून कार्यरत राहण्याची वेळ आली आहे. शिवाय राजकीय स्वार्थ, वैयक्तिक मते बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे.प्राधिकरणासाठी एकत्रित यावेकोल्हापूरचा विकास साधायचा असल्यास प्राधिकरणाला गती देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते म्हणाले, विकासाचे आव्हान स्वीकारण्यास मी तयार आहे. विमानसेवा लवकर सुुरू करण्यासह प्राधिकरणाबाबत मी पाठपुरावा करणार आहे.