शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

सौंदत्तीच्या गाड्या उद्या सुटणार

By admin | Updated: December 21, 2015 00:38 IST

१६१ एस.टी. बसेस बुकिंग : यात्रेकरूंच्या सुविधेत वाढ; सीसी कॅमेऱ्यांचा ‘वॉच’

कोल्हापूर : सौंदत्ती (कर्नाटक) येथे तीन दिवस होत असलेल्या श्री रेणुका देवीच्या यात्रेनिमित्त कोल्हापूर शहरातून १६१ एस. टी. बसेस बुकिंग झाल्या आहेत. याशिवाय खासगी वाहनांतून हजारो भाविक उद्या, मंगळवारी यात्रेसाठी रवाना होत आहेत. मंगळवार ते गुरुवार अशी तीन दिवस ही यात्रा होत आहे. गुरुवारी (दि. २४) मार्गशीर्ष पौर्णिमेदिवशी या यात्रेचा मुख्य दिवस असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातून यादिवशी सुमारे पाच लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर दाखल होतील. कोल्हापूर शहरातून या यात्रेसाठी आज, सोमवारी दहा एस. टी. बसेस भाविकांना घेऊन रवाना होत आहेत, तर उद्या पहाटे १५१ एस. टी. बसेस रवाना होत आहेत. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार असल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे. याशिवाय बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जुगुळबाई परिसर, सौंदत्ती डोंगरावर ऐनीकुंड व रेणुकादेवी मंदिर परिसरात काही प्रमाणात सुविधांची वाढ केली आहे. ‘उदं गं आई उदं’चा गजर करत उद्या सर्व एस. टी. बसेस सौंदत्ती यात्रेसाठी रवाना होत आहेत. यंदाच्या वर्षी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आगार येथून २५, संभाजीनगर बसस्थानक आगार येथून १३१, तर कर्नाटक सरकारच्या पाच बसेस भाविकांनी रविवारअखेर बुकिंग केल्या आहेत. या बसेस बुकिंगचा कालावधी संपला आहे. कर्नाटकच्या बुकिंग केलेल्या पाच बसेस या दुधाळी, मंगळवार पेठ या परिसरातील ग्रुपने बुक केल्या आहेत. विशेष म्हणजे, शहरातील पेठा-पेठांतील बहुतांश गल्ल्यांतून या बसेस रवाना होतात. भंडाऱ्याची उधळण, ‘उदं गं, आई उदं’चा गजर करत सजविलेल्या या सर्व बसेसमधून भाविक रवाना होतात. सौंदत्ती डोंगरावर जाणाऱ्या भाविकांत ८० टक्के भाविक हे महाराष्ट्रातील, तर केवळ २० टक्के भाविक हे कर्नाटकातील असतात. महाप्रसादाचे आयोजनकोल्हापुरातून उद्या सकाळी सहा वाजल्यापासून भाविक एस.टी.द्वारे यात्रेसाठी जाणार आहेत. घटप्रभा कॅनॉल येथे माजी आमदार मालोजीराजे यांच्यातर्फे रेणुका भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते, तर कागल येथे लक्ष्मी टेकडी लक्ष्मी देवीच्या मंदिरासमोर प्रसादाचे लाडू वाटप करण्यात येते. महाप्रसादानंतर जोगुळाभावी कुंड या ठिकाणी लिंब नेसण्याचा विधी होणार आहे. त्यानंतर भाविक सौंदत्ती डोंगर येथे दर्शनासाठी जाणार आहेत. सुविधांत काही प्रमाणात वाढसौंदत्ती येथे यात्रेकरूंची प्रत्येक वर्षी गैरसोय होते. यंदाही या गैरसोयींना सामोरे जावे लागू नये, यासाठी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने बेळगाव जिल्हाधिकारी एन. जयराम यांची यापूर्वीच भेट घेऊन भविकांना सुविधा देण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी जास्तीत जास्त सुविधा देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार जुगुळबाई देवीच्या मंदिरानजीक कुंडात पाणी कमी असल्याने येथे यंदाप्रथमच शॉवरवर अंघोळ करण्याची सोय केली आहे. सौंदत्ती डोंगरावर स्टँड ते मंदिर मार्गाचे यंदा मोठ्या प्रमाणावर रूंदीकरण केले आहे. मंदिरानजीक दर्शनरांग आणि ऐनीकुंडावर अंघोळ करणाऱ्या महिलांच्या दागिन्यांची चोरी होण्याचे प्रमाण दरवर्षी असते. त्यावर आळा घालण्यासाठी या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्हींद्वारे चोरट्यांवर वॉच ठेवण्यात येणार आहे.सौंदत्ती देवस्थानचे सचिव ग्रामोपाध्ये यांनी डोंगरावर स्वच्छता राखण्यासाठी जादा कर्मचारी तैनात केले आहेत. शौचालयांची संख्या वाढविली नसली तरी फिरती शौचालये या ठिकाणी जादा प्रमाणात ठेवण्यात येणार आहेत.