शिरोळ : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील वीटभट्ट्या धोकादायक बनत आहेत. कच्ची वीट भाजण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उंच भट्ट्यावरून वीज वितरणच्या तारा गेल्या आहेत. वीट उतविताना या वीज वाहिन्यांना स्पर्श होऊन भट्टीवरील कामगारांचा जीव धोक्यात आला असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, गेल्या महिन्यामध्ये हरिपूर येथील एका वीटभट्टी कामगाराचा या तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला होता. चिंचवाड येथे मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. कृष्णा नदी काठावरील लाल मातीचे उत्खनन करून चिंचवाड-उदगाव मार्गावरील वीटभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत.या ठिकाणाहूनच चिंचवाड गावासाठी वीज वितरण वाहिनीच्या तारा गेल्या आहेत. या तारेखालीच वीटभट्टी उभारण्यात आली असून, यामुळे वीट उतरविताना धोकादायक बनले आहे. (प्रतिनिधी)नियमबाह्य माती उपसाउदगाव-चिंचवाड दरम्यान मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या उभारण्यात आल्या आहेत. कृष्णा नदीकाठी वीट तयार करण्यासाठी बेसुमार माती उत्खनन करण्यात आली आहे. नियमबाह्य माती उत्खननाकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्नी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
वीटभट्ट्या बनल्या धोकादायक
By admin | Updated: June 23, 2015 00:10 IST