शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चॉकलेट घेण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीस शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 14:16 IST

‘चॉकलेट डे’ कार्यक्रमात चॉकलेट घेण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीला शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण करण्याची घटना कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात घडली.

ठळक मुद्देकोल्हापुरात कृषी महाविद्यालयात प्रकार विद्यार्थ्याचा ठिय्या; प्रशासनाकडून चौकशी

कोल्हापूर : ‘चॉकलेट डे’ कार्यक्रमात चॉकलेट घेण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीला शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्याला तिच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण करण्याची घटना कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात घडली.

दरम्यान, महाविद्यालयाबाहेरील तरुणांनी येऊन आवारात गोंधळ घातल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासमोर गुरुवारी दिवसभर ठिय्या आंदोलन करून संबंधित युवकांवर कारवाईची मागणी केली. यामुळे महाविद्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुढील आठवड्यात कृषी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन असल्याने त्याबाबत महाविद्यालयात गेले काही दिवस विविध ‘डे’ साजरे करण्यात येत आहेत. बुधवारी (दि. १२) सायंकाळी ‘चॉकलेट डे’ साजरा करताना तृतीय वर्षातील एका विद्यार्थ्याने प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला.

संबंधित विद्यार्थिनीने चॉकलेट घेण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्याने त्या विद्यार्थिनीस शिवीगाळ करून अर्धवट खाल्लेले चॉकलेट तिच्या अंगावर फेकले. ही बाब तिने आपल्या मावसभावास फोन करून सांगितली. संबंधित भावाने चार-पाच युवकांना घेऊन तातडीने महाविद्यालयाच्या आवारात येऊन त्या विद्यार्थ्यास बेदम मारहाण केली.गुरुवारी सकाळी ते सर्व तरुण पुन्हा महाविद्यालयाच्या आवारात आले; त्यामुळे परिसरात गोंधळ माजला. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी महाविद्यालयाबाहेरील युवकांची महाविद्यालयात सुरू असणारी गुंडागर्दी थांबवावी, अशी मागणी करीत महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन करून निदर्शने केली. तसेच महाविद्यालयीन कामकाज बंद पाडले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.महाविद्यालयाच्या प्रशासनाने तातडीने संबंधित पीडित विद्यार्थिनी, तिचे पालक तसेच संबंधित विद्यार्थी व त्याचे सहकारी यांची सुमारे दोन तास स्वतंत्रपणे चौकशी केली. त्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी चार वाजता संबंधित आंदोलन विद्यार्थ्यांनी स्थगित केले.दुचाकीची मोडतोडगुरुवारी सकाळी पीडित विद्यार्थिनीचे नातेवाईक पुन्हा महाविद्यालयाच्या आवारात आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते. त्यानंतर नातेवाईक दुचाकी वाहन तेथेच सोडून निघून गेले, युवकांनी त्या दुचाकीची मोडतोड करून ती गायब केल्याची चर्चा महाविद्यालय परिसरात होती.

‘चॉकलेट डे’ साजरा करताना विद्यार्थिनीला चॉकलेट घेण्यास विद्यार्थ्याने दबाव आणला. संबंधित विद्यार्थिनीने आपल्या भावाला हा प्रकार सांगितल्यानंतर हा वादावादीचा प्रकार घडला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. संबंधित विद्यार्थी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.- एस. आर. शिंदे, प्रभारी प्राचार्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर 

 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेkolhapurकोल्हापूरcollegeमहाविद्यालय