शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पराभव विसरून कामाला लागा : शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:53 IST

आंबा : ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापून ठेवायचा नसतो, तर ती जखम बरी करून पुन्हा जोमाने कामाला लागायचे ...

आंबा : ठेच लागली म्हणून पायाचा अंगठा कापून ठेवायचा नसतो, तरती जखम बरी करून पुन्हाजोमाने कामाला लागायचे असते. माझ्या पराभवामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास निश्चितच ढळला असेल, पण मी जर निवडणुकीच्या दु:खाला कवटाळून बसलो असतो तर देशातील शेतकरी आभाळाकडे आशाळभूत नजरेने बघत हतबल झाला असता. यामुळे पराभव विसरून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. आंबा येथे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्ता अभ्यास शिबिर झाले, त्यावेळी ते बोलत होते.स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीतील आढावा तसेच निवडणुकीत पक्षाला आलेले अपयश, त्याची कारणमीमांसा व विचारमंथन, केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, त्यामुळे उद्ध्वस्त झालेली शेती व गावगाडा तसेच त्याचे परिणाम, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पक्ष, युवा आघाडीची संघटनात्मक बांधणी, आगामी विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीची भूमिका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आगामी राजकीय तसेच आंदोलनाची दिशा या विविध विषयांवरती चर्चा झाली.यावेळी कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयश, चळवळीची पुढील दिशा, संघटना, पक्ष, महिला आघाडी व युवा आघाडीची संघनात्मक बांधणी या विषयावर मते मांडली. या शिबिरास जिल्हाध्यक्ष भगवान काटे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रात्रीचा दिवस करायावेळी राजू शेट्टी म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर मी राज्यामध्ये जवळपास दोन हजार किलोमीटरचा दुष्काळ दौरा केला. शेती क्षेत्राकडे सरकारने दुर्लक्षित केल्याने व राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे वाढल्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चळवळीच्या माध्यमातून शेतकºयांचे प्रश्न हातात घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी रात्रीचा दिवस करावा.