शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या विश्वासास पात्र राहू : आबिटकर

By admin | Updated: November 4, 2014 00:24 IST

राधानगरीत सत्कार : लबाडांना घरी बसवण्यासाठी मदत : पी. डी. धुंदरे

राधानगरी : सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने प्रचंड मताधिक्याने मला आमदार केले. लोकांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून चांगले काम करून दाखवेन, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.राधानगरी तालुक्यातील सर्वपक्षीयांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे होते. धुंदरे यांच्या हस्ते आमदार आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला.आबिटकर म्हणाले, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केवळ स्वत:चे व पै-पाहुण्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी पदाचा गैरवापर केला. यामुळेच जनतेने त्यांना धडा शिकविला. त्यांच्या तावडीतून अन्य सत्तास्थाने सोडविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करून मला मदत करणाऱ्यांना ताकद देईन.धुंदरे म्हणाले, लबाड आमदारांना घरी बसविण्यासाठीच काँग्रेसने आबिटकर यांना पाठबळ दिले. पक्षभेद विसरून कार्यकर्त्यांनी मदत केली. भविष्यात त्याचा विसर पडणार नाही याची दक्षता घ्या.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले म्हणाले, भ्रष्टप्रवृत्ती विरोधातील एकजूट कायम ठेवून ती समूळ नष्ट करण्यासाठी यापुढेही प्रयत्न सुरूच राहतील.अभिजित तायशेटे, सुप्रिया साळोखे, सुभाष पाटील, सत्यजित जाधव, अ‍ॅड. बी. जी. खांडेकर, संदीप डोंगळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.हिंदुराव साळोखे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मारुतीराव जाधव, दिनकरराव जाधव, तानाजी चौगले, राजेंद्र लोखंडे, बंडा वाडकर यांची भाषणे झाली. सदाशिव चरापले, उदय पाटील, विजय मोरे, बी. एस. देसाई, मधुकर देसाई, कल्याणराव निकम, जयसिंग खामकर, नंदकिशोर सूर्यवंशी, रमेश पाटील, संभाजी आरळे यांच्यासह प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)रणशिंग फुकले !आगामी जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती तसेच बिद्री व भोगावती कारखान्यांतही राष्ट्रवादी विरोधात रणशिंग फुंकल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.संयोजकांकडून माफीकार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवरील नावावरून दोन दिवस मोठा असंतोष पसरला होता. अनेकांची नावे वगळल्याने त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे संयोजकांना माफी मागावी लागली.