शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वस्त्रनगरी शेतकरी संघटनांची संघर्षभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:48 IST

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : महाराष्टÑातील भाजपप्रणीत महायुतीचा एल्गार इचलकरंजीतील थोरात चौकातून झाला होता. त्याला साडेतीन वर्षे उलटली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर खोत हे नवीन शेतकरी संघटनेची घोषणा दसºया दिवशी इचलकरंजीतच पहिला राज्यव्यापी मेळाव्यात करणार आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगात ...

राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : महाराष्टÑातील भाजपप्रणीत महायुतीचा एल्गार इचलकरंजीतील थोरात चौकातून झाला होता. त्याला साडेतीन वर्षे उलटली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर खोत हे नवीन शेतकरी संघटनेची घोषणा दसºया दिवशी इचलकरंजीतच पहिला राज्यव्यापी मेळाव्यात करणार आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगात अग्रेसर असलेले हे शहरच संघर्षभूमी ठरणार, असाच राजकीय व्होरा आहे. म्हणूनच या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.यापूर्वी बहुतांशी वेळा राजकीय क्षेत्रात नव्याने होणाºया आघाडी किंवा युतीचा प्रारंभ करवीरनगरीतून होत असे. मात्र, त्याला ३१ जानेवारी २०१४ ही तारीख अपवाद ठरली. त्यावेळी भाजप-शिवसेना-स्वाभिमानी शेतकरी-राष्टÑीय समाज पक्ष-रिपब्लिकन पार्टी-आठवले गट अशी युतीची पहिली महासभा इचलकरंजीतील थोरात चौकात झाली. त्या सभेची धुरा खासदार शेट्टी व आमदार सुरेश हाळवणकर यांच्या खांद्यावर होती. तेव्हा सभेत गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, रामदास आठवले, खासदार शेट्टी, महादेव जानकर, आमदार हाळवणकर अशा नेत्यांनी पहिलेच मैदान गाजविले.अशी पार्श्वभूमी असलेल्या इचलकरंजीतच दुसरी शेतकरी संघटना घोषित करणाºया राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दसरा मेळावा शनिवारी (दि. ३० सप्टेंबर) होत असल्याने त्याला महत्त्व आहे. खासदार शेट्टी यांची शिरोळ तालुक्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजकीय कारकीर्द चालू झाली. त्यानंतर संघटनेचे लोण पश्चिम महाराष्टÑ व त्या पाठोपाठ राज्यात फोफावले. तेव्हा सत्तारूढ असलेल्या कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी सरकारच्या विरोधात ‘स्वाभिमानी’ ने संघर्ष केला.सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडल्या आणि आघाडीच्या विरोधात महायुती जन्माला आली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी ‘स्वाभिमानी’ चे म्हणून सदाभाऊ खोत कृषी-पणन व फलोत्पादन राज्यमंत्री झाले. केंद्रात व राज्यात भाजपप्रणीत सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारप्रमाणेच शेतकºयांच्या प्रश्नाकडे महायुती दुर्लक्ष करीत असल्याचे खासदार शेट्टी यांच्या लक्षात आले आणि कृषी कर्जमाफीच्या वेळी तर सरकार व ‘स्वाभिमानी’तील संघर्षाने टोक गाठले. ‘स्वाभिमानी’ने सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली असताना राज्यमंत्री खोत मात्र सरकारच्याच बाजूला राहिले. अखेर ‘स्वाभिमानी’ने खोत यांना संघटनेतून बाजूला केले. त्याचाच परिपाक म्हणजे नवीन शेतकरी संघटनेचा उदय मानला जात आहे. त्याची वाटचाल मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादावर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.नवीन संघटना भाजपप्रणित ?इचलकरंजीत शनिवारी ( दि. ९ सप्टेंबर) झालेल्या एका कार्यक्रमात राज्यमंत्री खोत यांनी सध्याच्या सरकारचे गोडवे गायले होते. ते म्हणाले, पूर्वीच्या आघाडी सरकारने उसासाठी किमान किफायतशीर दर जाहीर करावा, यासाठी आम्हाला रक्त सांडावे लागले. मात्र, सध्याच्या युती सरकारने उसासाठी साखर उताºयावर आधारित किमान दर जाहीर केला आहे. तो ९ टक्के उताºयासाठी २५५० रुपये प्रतिटन ते १२ टक्के उताºयासाठी ३२२० रुपये प्रतिटन इतका आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळणार आहे. जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री निधीतून शेती सिंचन, अशा अनेक योजनांचाही उल्लेख केला. त्यामुळे खोत यांची नवी शेतकरी संघटना ही भाजपप्रणीत संघटना असणार का, याचीच उत्सुकता आहे.‘स्वाभिमानी’ वर घावघालण्यासाठी इचलकरंजीच बरीशिरोळ हा ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला असून, लगतच्या हातकणंगले तालुक्यात ‘स्वाभिमानी’चा कमालीचा प्रभाव आहे. ‘स्वाभिमानी’वर आघात करायचा असेल, तर शिरोळ आणि हातकणंगले या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागात दुसºया शेतकरी संघटनेला मेळावा घेता येणार नाही. त्यातल्या त्यात सदाभाऊ खोत यांच्या संघटनेला तीव्रपणे विरोध होणार; पण शिरोळपासून जवळच असलेले इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे ‘स्वाभिमानी’ काही प्रमाणात ‘वीक’ आहे. म्हणून सुरक्षितता आणि शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत मर्मावर घाव घालणारा मेळावा म्हणून इचलकरंजीची निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.