शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आजऱ्यातील २६ ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 15:10 IST

grampanchyat, elecation, kolhapurnews आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्यापही झालेले नाही. तरीही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून रणशिंग फुंकले आहे. प्रभागनिहाय मतदारयादी १ डिसेंबरला प्रसिद्ध होणार असून हरकतीनंतर १० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

ठळक मुद्देप्रभागनिहाय १ डिसेंबरला मतदार यादी प्रसिद्ध होणार १५ जानेवारीपूर्वी निवडणूक घेण्याचे प्रशासनाचे नियोजन

सदाशिव मोरे

आजरा  : आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्यापही झालेले नाही. तरीही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून रणशिंग फुंकले आहे. प्रभागनिहाय मतदारयादी १ डिसेंबरला प्रसिद्ध होणार असून हरकतीनंतर १० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.ग्रामपंचायत निवडणुका या २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहेत. ग्रामपंचायतीचा सदस्यापासून सरपंचपदाची संधी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवाळीत घरोघरी जावून शुभेच्छा देणे, फराळाचे वाटप करणे, रेशनकार्डपासून ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र देणे, शेतीच्या बांधावरून झालेली भांडणे मिटविणे त्यामधून विरोधकांचा काटा काढणे हे प्रकार सुरू आहेत.सरपंचपदासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून गावातून फिरणेस सुरूवात केली आहे. आपलप्या गटाच्या लोकांना एकत्रित करून आश्वासनांचे डोंगर उभे केले जात आहेत. जेवणावळी सुरू आहेत. तालुक्याच्या नेत्यांजवळी आपल्यालाच सरपंचपद मिळणेसाठी बेरजेचे आडाखे बांधले जात आहेत.

 महागोंड, मुमेवाडी, चव्हाणवाडी, खोराटवाडी, जाधेवाडी, बेलेवाडी, हालेवाडी, चिमणे, गवसे, देवर्डे, एरंडोळ, देवकांडगाव, हाळोली, हत्तीवडे, होनेवाडी, कासारकांडगाव, मुरूडे, सुळे, निंगुडगे, सरोळी, किणे, मलिग्रे, शिरसंगी, वाटंगी, पेद्रेवाडी या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.

२६ ग्रामपंचायतींचे ७८ प्रभाग असून २०६ सदस्य निवडले जाणार आहेत. १० डिसेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १५ डिसेंबरपासून निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होणार आहे. नवीन वर्षात १५ जानेवारीपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक