शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

 ‘बार्टी’तर्फे आता पहिलीचा प्रवेशही आॅनलाईनच : प्रवेश प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 13:52 IST

शासनच या मुलांचा खर्च उचलते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व उपसंचालक कार्यालयामार्फत याचे नियंत्रण होते. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोल्हापूर : दुर्बल, वंचित घटकातील बालकांच्या शिक्षणासाठी आता ‘बार्टी’ अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेनेही आपला हात पुढे केला आहे.

आरटीईअंतर्गत पहिलीसाठीची प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून राबविण्यात येणार आहे. यासाठी विचारेमाळ येथील समाजकल्याणच्या कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार जिल्ह्यात दुर्बल, वंचित घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवून त्यांना मोफत शिक्षण दिले जाते. शासनच या मुलांचा खर्च उचलते. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग व उपसंचालक कार्यालयामार्फत याचे नियंत्रण होते. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

आता यात बार्टीनेही हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. विचारेमाळ येथे कार्यरत असलेल्या समाजकल्याणच्या प्रशासकीय कार्यालयातून ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठीचे फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आजपासूनच ती प्रक्रिया सुरू झाली आहे.

अहिल्याबाई सेंट्रल स्कूलमध्ये बुधवारी या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष माने, नूतन मराठी शाळेचे सचिन हावळ, पद्माराजे विद्यालयाचे अमित जाधव, सर्व शिक्षा अभियानचे अविनाश लाड उपस्थित होते.या प्रवेशासाठीची अटपाल्याचा जन्म जुलै २0१३ ते आॅक्टोबर २0१४ या कालावधीतील हवा.तो महाराष्ट्राचाच रहिवासी हवा.

  • लागणारी कागदपत्रे
  • एक लाखापर्यंतची उत्पन्न मर्यादा
  • आधार कार्ड
  • जन्म दाखला
  • जातीचा दाखला

 

आॅनलाईन फॉर्म भरताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, प्रवेशासाठी येणाऱ्या पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या हेतूनेच हा विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रवेश कालावधीत सुट्टी व्यतिरिक्त हा कक्ष सुरू राहणार आहे.आशा रावण, जिल्हा समन्वयक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळा