शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जातीच्या दाखल्याचा शिष्यवृत्तीमध्ये ‘अडसर’

By admin | Updated: December 28, 2015 01:09 IST

किचकट प्रक्रिया : जिल्ह्यातील ११ हजार १४५ विद्यार्थी वंचित राहणार

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर -मागासवर्गीय व अनुसूचित विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती मिळण्यात जातीच्या दाखल्याची अटच अडथळा ठरत आहे. जातीचा दाखला काढणे किचकट आणि खर्चिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ११ हजार १४५ विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला काढलेला नाही. परिणामी, विद्यार्थ्याच्या शाळेच्या दाखल्यावरील जातीचा पुरावा ग्राह्य धरून शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे; अन्यथा जातीचा दाखला नसलेले विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून प्रत्येक शैक्षणिक वर्षात पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती आणि आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थिनीला वर्षाला ६०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. नववी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जमातीची मुले आणि मुली यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपये मिळतात. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज प्रत्येक वर्षी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन भरून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविले जातात. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी संबंधित विद्यार्थी अन्य कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा व त्याचा जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. जिल्ह्णात विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जमाती, मागासर्गीय या जातीचे पाचवी ते सातवीच्या १५ हजार तर आठवी ते दहावीचे १७ हजार ३१२ विद्यार्थी आहेत. शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यात दिरंगाई झाल्यामुळे एका दलित संघटनेने आंदोलन केल्यानंतर समाजकल्याण आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या प्रशासनाने संयुक्तपणे सर्व्हे केला. त्यामध्ये नववीच्या ६ हजार २५२ तर दहावीच्या ४ हजार ८९३ विद्यार्थ्यांकडे जातीचा दाखला नसल्याचे समोर आले आहे. याउलट नववीच्या २२४४ आणि दहावीच्या २९५८ विद्यार्थ्यांकडे जातीचे दाखले असल्याचे स्पष्ट झाले. गेल्यावर्षीही हीच अडचण आली होती. त्यामुळे शासनेने नातेवाईकांचा जातीचा दाखला घेऊन शिष्यवृत्ती द्यावी, अशी विशेष परवानगी दिली होती. यंदा अशी परवानगी मिळालेली नाही. परिणामी, शिष्यवृत्तीसाठी जातीचा दाखला काढावाच लागणार आहे.सर्वाधिक हातकणंगले तालुक्यात..जातीचा दाखला नसलेल्या नववी आणि कंसात दहावीच्या विद्यार्थ्यांची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा - ११० (८९), भुदरगड - १६१ (१७७), चंदगड - २०६ (१९७), गगनबावडा - ८६ (६९), गडहिंग्लज - २३३ (२११), हातकणंगले - १७५४ (११२९), कागल - ३९२ (३६२), करवीर - ७१३ (६१६), पन्हाळा - ५७४ (४९६), राधानगरी - १८१ (१४७), शाहूवाडी - २७६ (२३४), शिरोळ - ६२६ (४२९), कोल्हापूर शहर - ९३४(७३७) .शिष्यवृत्तीसाठी संबंधित विद्यार्थ्याचा जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे. जातीचा दाखला नसलेल्या विद्यार्थ्यांची नेमकी संख्या सर्व्हेतून मिळाली आहे. त्यामुळे शाळेतच जातीचा दाखला काढण्यासाठी महसूल विभागाच्या मदतीने विशेष शिबिर आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- सुंदरसिंह वसावे, समाजकल्याण अधिकारी