शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

बापरे...मार्च अखेरलाच कोल्हापूरचा पारा ४० अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

कोल्हापूर : एका बाजूला कोरोनाचा कहर वाढत असताना दुसऱ्या बाजूला आग ओकणाऱ्या सूर्यामुळे कोल्हापूरकर कासावीस झाले आहेत. मंगळवारी दुपारी ...

कोल्हापूर : एका बाजूला कोरोनाचा कहर वाढत असताना दुसऱ्या बाजूला आग ओकणाऱ्या सूर्यामुळे कोल्हापूरकर कासावीस झाले आहेत. मंगळवारी दुपारी तापमानाने या हंगामातील सर्वोच्च ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. मार्च अखेरलाच तापमानाने चाळीशी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली असून गतवर्षीपेक्षा ही वाढ ५ ते ६ अंश सेल्सिअसने जास्त आहे. एप्रिल महिन्यात तर सूर्य आग ओकणार असल्याचे हवामानाचे आकडे सांगत आहेत. साधारपणे ४३ ते ४४ अंशापर्यंत पारा जाण्याची शक्यता असून आताच घाम फुटण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर हे घाटमाथ्यावर असल्याने मुळातच गारव्याचे वरदान लाभले आहे. पण गेल्या पाच सहा वर्षांत गारव्याचे रुपांतर हळूहळू वणव्यात होऊ लागले आहे. वाढलेली उष्णता पाहून सांगली, सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यात आहोत की काय अशी शंका येऊ लागली आहे. कितीही तापले तरी कोल्हापूरचे तापमान ४० पर्यंतच जाऊन थांबायचे, हे देखील एप्रिल मे महिन्यात. गेल्या वर्षी मे महिन्यात ४१ ते ४२ तापमानाचा कडाका अनुभवावा लागला. यावर्षी मात्र मार्च संपण्याआधीच तापमानाने चाळीशी गाठली. मंगळवारी दुपारी ३ वाजता तापमान ४० अंशावर जाऊन पोहोचले. पाच वाजेपर्यंत ते ३८ पर्यंत खाली आले. बुधवारी देखील हीच अवस्था राहणार आहे. सकाळी दहा वाजता ३० अंशापासून पारा पुढे सरकत १ वाजेेपर्यंत ३८, दोन पर्यंत ३९ आणि ३ वाजता ४० असा पारा चढता राहिला.

चौकट ०१

झाडांची सावली हवीहवीशी

उष्मा एवढा वाढला आहे की झाडाची सावली आली आणि वाऱ्याची मंद जरी झुळूक आली तरी जीवाची घालमेल काहीशी कमी होत आहे. घशाला कोरड पडल्याने गारवा शोधण्यासाठी आईस्क्रीमसह थंडपेये व फ्रूट सॅलड खाण्यासाठी गर्दी वाढली आहे. डोक्यावर टोपी, हॅट, रुमाल याशिवाय उन्हात फिरणे अवघड झाले असून अंग भाजून काढणाऱ्या झळांमुळे घामाच्या धारा वाहत आहेत.

चौकट ०२

मार्च अखेर तापलेलाच

गेल्या वर्षी मार्चअखेरला तापमानाचा पारा कमाल ३४ तर किमान २४ अंश सेल्सिअस इतका होता. संपूर्ण महिना तो कमी अधिक प्रमाणात तसाच होता. तो यावर्षी मात्र त्यात एकदम ५ ते ६ अंशांनी वाढत होत ३५, ३६ असे करीत वेगाने ४० पर्यंत झेपावला आहे.

चौकट ०३

साधारणपणे २५ एप्रिलपर्यंत सूर्य आग ओकणार आहे. त्यानंतर मे महिन्यात पारा ३८ ते ३९ पर्यंत खाली येणार आहे. एप्रिल महिन्यात ५, ६, ७, ८ अशा चार दिवसांत तर उष्णतेची प्रचंड लाट येणार असून पारा ४३ ते ४४ अंशावर राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने धास्ती वाढली आहे. मे मध्ये पारा कमी होणार आहे, एवढाच काय तो दिलासा आहे.

चौकट ०४

पुढील आठवडाभरातील संभाव्य तापमान

वार कमाल किमान

बुधवार ४० १६

गुरुवार ३९ १८

शुक्रवार ३८ १७

शनिवार ३७ १७

रविवार ३९ १८

सोमवार ४४ २१

बुधवार ४३ २०