येथील बँक ऑफ इंडिया शाखा नेसरीतर्फे बँक आपल्या दारी उपक्रमांतर्गत तारेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे शिबिराद्वारे बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली.
नेसरी हे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तीनही तालुक्यांचे मध्यवर्ती बाजारपेठेचे केंद्र आहे. नेसरी येथे बँक ऑफ इंडिया ही एकमेव राष्ट्रीयीकृत बँक आहे. बँकेमध्ये खातेदारांची संख्याही मोठी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाखाधिकारी दिगंबर लाळगे यांनी 'बँक आपल्या दारी' उपक्रम राबवून कॅम्पच्या माध्यमातून खातेदारांना मार्गदर्शन करून बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी ७५ खातेदारांचे विविध प्रकारचे विमा उतरविण्यात आले. यावेळी सरपंच मालू भारती, उपसरपंच युवराज पाटील, सुरेश तुरटे, शिवाजी तुरटे, शिवाजी गुरव, संजय धनके, दादासाहेब पाटील, बबन पाटील, दयानंद गंगली, नारायण तुरटे, आनंदा पाटील, परशराम पाटील यांच्यासह खातेदार व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेतर्फे 'बँक आपल्या दारी' उपक्रमांची शाखाधिकारी दिगंबर लाळगे यांनी माहिती दिली. यावेळी सरपंच मालू भारती, उपसरपंच युवराज पाटील, शिवाजी गुरव, सुरेश तुरटे, दयानंद गंगली, दादासाहेब पाटील, आनंदा पाटील, शिवाजी तुरटे आदी उपस्थित होते.
क्रमांक : २५०३२०२१-गड-०९