शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणाला विरोध; बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप, कोल्हापुरात १५०० कोटींचे व्यवहार होणार ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:54 IST

सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील बँक कर्मचारी १६ व १७ डिसेंबरला संपावर जात आहेत.

रमेश पाटील

कोल्हापूर : खासगीकरणाला विरोध करण्यासाठी आज गुरुवारपासून दोन दिवस (दि. १६ व १७ डिसेंबर) बँक कर्मचाऱ्यांच्या संपातकोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सर्वच राष्ट्रीयीकृत आणि काही खासगी बँकांचे मिळून दोन हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसात सुमारे दीड हजार कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील बँक कर्मचारी १६ व १७ डिसेंबरला संपावर जात आहेत.मागील वर्षी अर्थसंकल्पात बँकांच्या खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर झाला होता. तेव्हापासून बँक कर्मचाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून हा दोन दिवसांचा संप करण्यात येत आहे.दरम्यान, बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेल्यामुळे त्यांचा दोन दिवसाचा पगार कापला जाणार आहे. वर्षभरात देशभरातील दहा लाख कर्मचारी किमान सात ते आठ दिवस संपावर जातात.

सरकारी बँका खासगी झाल्या तर...

सरकारी बँका खासगी झाल्या तर त्याचा बँकिंग क्षेत्रावर मोठा परिणाम होईल, असे बँक कर्मचारी संघटनांना वाटते. खासगीकरण झाल्यास नवीन खाते उघडायला पाच ते दहा हजार रुपये लागतील. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला बँकेत खाते उघडणे मुश्कील होईल. गरीब शेतकरी शेतमजुरांना कर्ज मिळणे दुरापास्त होईल. सरकारी योजनांपासून सामान्य जनता दूर राहील. सर्व जनतेच्या बचत ठेवी असुरक्षित होतील. ग्रामीण भागातील बँक शाखा बंद होतील.

लक्ष्मीपुरी शाखेसमोर निदर्शने

सरकारच्या या निर्णयाविरोधात आज, गुरुवारी व उद्या शुक्रवारी (दि. १६ व १७) सकाळी साडेदहा वाजता बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेसमोर सर्व बँकांचे कर्मचारी एकत्र जमून निदर्शने करणार आहेत, अशी माहिती बँक कर्मचारी संघटनेचे सूर्यकांत कर्णिक व संजय उलपे यांनी दिली.

क्लेअरिंग इफेक्ट तीन दिवस लेट

संपामुळे बँकांचे क्लिअरिंग गुरुवार, शुक्रवार दोन दिवस बंद राहणार आहे, तर शनिवारी एक दिवस बँक सुरू करणार असून, रविवारी पुन्हा साप्ताहिक सुट्टी आहे. या सर्व गोष्टीचा बँकांच्या क्लेअरिंगवर परिणाम होणार असून, क्लिअरिंग इफेक्ट तब्बल तीन दिवस पुढे जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकStrikeसंप