शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

Kolhapur: चित्रपट महामंडळातील व्यवहार, धोरणात्मक निर्णयांवर बंदी; धर्मादायने दिले चौकशीचे आदेश

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: February 23, 2024 14:40 IST

महामंडळाच्या कार्यकारिणीची मुदत ५ मे २०२१ साली संपल्यानंतर घटनेत तरतूदच नसलेल्या व बेकायदेशीर काळजीवाहू कार्यकारी मंडळाने मनमानी कारभार केला

कोल्हापूर : गेल्या अडीच वर्षात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या काळजीवाहू कार्यकारी मंडळाने केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून दोन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी दिले. निवडणूक होऊन नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यत संस्थेचे आर्थिक व्यवहार निरीक्षकांच्या सहीने करण्यात यावेत. तसेच या काळात धोरणात्मक निर्णय घेऊ नये असा आदेश दिला आहे. सभासद बाबासो लाड व सुनिल मुसळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ते म्हणाले, महामंडळाच्या कार्यकारिणीची मुदत ५ मे २०२१ साली संपल्यानंतर घटनेत तरतूदच नसलेल्या व बेकायदेशीर काळजीवाहू कार्यकारी मंडळाने मनमानी कारभार केला आहे. त्याविरोधात आम्ही सभासदांनी आंदोलन करून धर्मादाय सहआयुक्तांकडे कार्यकारिणीला खर्चास मनाई हुकुम व्हावा व संस्थेवर प्रशासक नेमावा अशी मागणी केली होती. त्यावर धर्मादाय सहआयुक्तांनी १२ तारखेला हा निकाल दिला आहे. यानुसार धर्मादाय उपायुक्त व सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी संस्थेतील आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

तसेच विद्यमान कार्यकारिणीचे खर्चाचे सर्व अधिकार काढून घेतले आहेत. यापुढील सर्व आर्थिक व्यवहार कार्यालयीन निरीक्षकांच्या सहीने करण्याचा आदेश दिला आहे. तसेच काळजीवाहू कार्यकारिणीने दैनंदिन कारभाराव्यतिरिक्त धोरणात्मक निर्णय घेऊ नये असा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. सभासदांच्यावतीने ॲड. डी. एस. पाटील यांनी काम पाहिले. यावेळी मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर, अमर मोरे, विजय ढेरे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

गेली दोन वर्ष आमच्यावर बिन बुडाचे आरोप केले जात आहेत महामंडळामध्ये कोणतेही आर्थिक गैरव्यवहार झालेले नाहीत. धर्मादाय कडून  चौकशी झाल्यामुळे सत्य बाहेर येईल. गेली अडीच वर्षे आम्ही कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतलेले नाही. एकाही धनादेशावर माझी सही नाही.  आता निरीक्षकांच्या सहीने सर्व व्यवहार होणार असल्याने आमच्यावर अवास्तव खर्च केल्याचा आरोपही राहणार नाही. त्यामुळे हा निर्णय सर्वांच्या हिताचाच असल्यामुळे आम्ही त्याचे स्वागत करतो. सभासदांना ही सत्य समजेल. - मेघराज राजे भोसले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

कार्यकारिणीवरील आक्षेप

  • सावंतवाडी व औरंगाबाद शाखेतील अनुक्रमे ५० हजार व १ लाख ३४ हजार रुपये कुठे गेले?
  • पुणे फेस्टिवलसाठी १ लाख २५ हजारांचा निधी
  • निर्माते शंकर भेंडेकर यांना ५ लाख रुपये देणे
  • न्यायालयीन खर्च व वकिलांच्या फीसाठी ५ लाख
  • काेरोना मदतखर्च व ताळेबंद व स्वतंत्र खाते नाही.
  • मुदत संपल्यानंतर अध्यक्षांना दीड लाख प्रवास खर्च.
  • निवडणूक खर्चासाठी १५ बेअरर धनादेश रक्कम व तारीख न टाकता ठेवणे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर