शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबा खेट्यांवर बंदी,केवळ धार्मिक विधींना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:06 IST

Jyotiba Temple Coronavirus Kolhapur- वाढल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अवर सचिव तथा सचिवांना पाठवले आहे.

ठळक मुद्देजोतिबा खेट्यांवर बंदी, केवळ धार्मिक विधींना परवानगीजिल्हाधिकाऱ्यांचे देवस्थानला पत्र

कोल्हापूर : वाढल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु पारंपरिक पध्दतीने धार्मिक विधी करण्यास कमीत कमी मानकरी पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अवर सचिव तथा सचिवांना पाठवले आहे.दरवर्षी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे होणाऱ्या श्री जोतिबा खेट्यांसाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर व परिसरात होते. यंदादेखील रविवारपासून (दि. २८) पुढील चार रविवारी खेट्यांसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत २८ फेब्रुवारी रोजी रात्री बारापर्यंत वाढवण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत निर्देश देऊन त्यांची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सूचित केले आहे. त्या अनुषंगाने यात्रा, उत्सव, उरूस यावर बंदी घालण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र देवस्थान समितीला पाठवले असून त्यात वाडी रत्नागिरी येथे पुढील चार रविवारी होणारे जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. परंतु, पारंपरिक पध्दतीने धार्मिक पूजा विधी करण्यास कमीत कमी मानकरी-पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात येत आहे. मात्र श्री जोतिबा खेटे कार्यक्रमास भाविकांना व नागरिकांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे म्हटले आहे.--

टॅग्स :Jyotiba TempleजोतिबाReligious Placesधार्मिक स्थळेcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर