शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
2
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
3
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
4
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
5
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
6
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
7
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
8
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
9
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
10
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
11
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
12
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
13
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
14
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
15
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
16
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
17
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
18
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
19
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
20
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: बाळूमामा देवस्थानने रस्ता नसताना वाहनतळासाठी निढोरीत घेतली जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:46 IST

शेतजमिनी घेताना नियम पायदुळीची तक्रार

शिवाजी सावंतगारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवस्थान समितीने निढोरी (ता. कागल) येथे वाहनतळ उभारणीसाठी गट नंबर ४३९ मधील ३७.५० गुंठे जमीन खरेदी केली आहे. मात्र, या जमिनीकडे जाण्यासाठी कोणताही रस्ता किंवा पाणंद मार्ग उपलब्ध नाही अशा अडचणीच्या ठिकाणी कोणता तळ उभा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.या जमिनीचे मूळ मालक आनंदा शंकर देवळे यांनी वटमुखत्यारपत्र तन्मय दत्तात्रय बाचणकर यांच्या नावे दिले होते. बाचणकर यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी ही जमीन ३ कोटी ५१ लाख ४५० रुपयांना देवस्थानला विकली. निढोरी गट नंबर ४३४ मधील ७२ गुंठ्यांपैकी ५६ गुंठे जमीन देवस्थान समितीने २५ सप्टेंबर २०२५ रोजी खरेदी केली. या जमिनीबाबत विठ्ठल मारुती पाटील व बंडेराव मारुती पाटील या भावांना ५ कोटी २४ लाख २२ हजार ७२० रुपये मोबदला देण्यात आला. नगररचना विभागाने एनए (बिगरशेती) परवानगी दिलेली नसताना जमिनीचे पैसे चौरस फूट दराने अदा करण्यात आले. खरेदी मात्र शेतजमीन म्हणून दाखवल्याची तक्रार आहे.

वाचा : बाळूमामा देवस्थानने दीड कोटी मोजून खरेदी केलेली जमीन कागदोपत्री, प्रत्यक्षात जागा गायबसुमारे दोन कोटी चोवीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यातून अन्य व्यक्तींच्या नावे का वर्ग झाले याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे. त्यासंबंधीचे निवेदन प्रातांधिकाऱ्यांना गुरुवारी प्रवीण पाटील (बिद्री), रवींद्र पाटील (फये) आणि हणमंत पाटील (आकुर्डे) यांनी दिले.मूळ जमीनमालक,वटमुखत्यारपत्रधारक,देवस्थान समितीचे सर्व विश्वस्त व संबंधित कारभारी यांची चौकशी करण्याची मागणी भक्त प्रवीण पाटील (बिद्री.ता.कागल) यांनी केली आहे. 

जमीनखरेदीत विश्वासात घेतले नाहीदेवस्थान समितीचे विश्वस्त दिलीप पाटील म्हणाले, निढोरी येथील प्रत्यक्षात दाखवलेली जमीन न घेता दुसऱ्याच जमिनी खरेदी केल्या आहेत. या जमिनी खरेदी करताना आदल्या दिवशी वीस लाख रुपयांना वटमुखत्यारपत्र झालेली जमीन दुसऱ्या दिवशी साडेतीन कोटी रुपयांना विकत घेताना कार्याध्यक्ष, सचिव यांनी आम्हा विश्वस्तांना कोणतीही कल्पना दिलेली नाही अथवा बैठक घेऊन बहुमताचा ठराव मंजूर केलेला नाही.मानद अध्यक्षांची चौकशीची मागणीया संदर्भात देवस्थान समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता ते म्हणाले, संत बाळूमामा देवस्थान हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. भक्तांच्या दानातून जमिनी खरेदीच्या नावाखाली हेराफेरी झाल्याची शंका आहे. प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून निकोप चौकशी करावी.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Balumama Devasthan bought land without road access for parking.

Web Summary : Balumama Devasthan's land purchase in Nidhori for parking raises concerns due to lack of road access. Allegations of financial irregularities and procedural lapses have led to calls for investigation involving trustees and officials.