शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
2
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
3
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
4
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
5
त्यांनी बुमराहला 'जायबंदी' करण्याचा प्लॅन आखलेला; माजी क्रिकेटरनं थेट स्टोक्स अन् जोफ्राचं घेतलं नाव
6
Jeans Ban : जीन्स घालून 'या' देशात फिराल, तर थेट तुरुंगात जाल! कोणत्या देशात आहे हा नियम?
7
७ करोड...म्हणणारे अमिताभ बच्चन 'केबीसी'च्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेतात?
8
१७,००० चा AI प्रोग्राम एअरटेल देणार मोफत! काय आहे पर्प्लेक्सिटी AI? फायदे वाचून थक्क व्हाल!
9
डिविडेंड नंतर आता बोनस शेअर्स देणार, १ वर २ शेअर्स देणार बाबा रामदेव यांची कंपनी
10
बायकोशी कडाक्याचं भांडण झालं, नवरा रागाच्या भरात तडक चालत निघाला-पाहा कुठं पोहचला... 
11
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
12
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
13
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
14
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
15
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
16
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
17
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
18
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
20
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”

बालगोपालचा खंडोबावर विजय

By admin | Updated: December 5, 2014 00:52 IST

केएसए फुटबॉल लीग : ‘कोल्हापूर पोलीस’ची ‘पॅट्रियट’वर एकतर्फी मात

कोल्हापूर : के. एस. ए. लीग फुटबॉल सामन्यात आज, गुरुवारी कोल्हापूर पोलीस संघाने पॅट्रियट स्पोर्टस्वर २-० अशी एकतर्फी मात केली; तर दुसऱ्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने रोहित कुरणेच्या एकमेव गोलवर खंडोबा तालीमचा पराभव केला. छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेत दुसरा सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात झाला. बालगोपालने खंडोबाच्या गोलक्षेत्रात प्रारंभापासून सातत्याने खोलवर चढाया केल्या. मात्र, खंडोबाच्या सजग बचावफळीमुळे त्या निष्प्रभ ठरल्या. उत्तरार्धात, बालगोपालकडून अभय संभाजीचे, रोहित कुरणे, सचिन गायकवाड यांनी खंडोबाच्या गोलक्षेत्रात अनेक खोलवर चढाया केल्या. अखेर ५२ व्या मिनिटास ऋतुराज पाटीलच्या पासवर रोहित कुरणे याने गोलची नोंद करीत बालगोपालला १-० अशी आघाडी मिळवून दिली. खंडोबाला अखेरपर्यंत सामन्यात बरोबरी करता आली नाही. त्यामुळे सामना बालगोपालने १-० असा जिंकला. दुपारच्या सत्रातील पहिला सामना कोल्हापूर पोलीस संघ विरुद्ध पॅट्रियट स्पोर्टस् यांच्यात झाला. पोलीस संघाच्या सोमनाथ लांबोरे, अमोल चौगुले, रोहित ठोंबरे, संतोष तेलंग यांनी पूर्वार्धात पॅट्रियट संघावर दबाव निर्माण केला होता.उत्तरार्धात पॅट्रियटकडून नईमुद्दीन सय्यद, मैन्नुद्दीन सय्यद, संदीप पाटील, साई वडणगेकर यांनी पोलीस संघावर गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. ५२व्या मिनिटास पोलीस संघाकडून अमोल चौगुले याने मैदानी गोलची नोंद करीत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी पॅट्रियटकडून साई वडणगेकर, रजत शेट्टी, संतोष निकम, संदीप पाटील यांनी अनेक खोलवर चढाया करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस संघाचा गोलरक्षक अमर आडसूळ व भक्कम बचावफळीमुळे त्यांचे प्रयत्न निष्प्रभ ठरले. ६६ व्या मिनिटास पोलीस संघाच्या सोमनाथ लांबोरे याने गोलची नोंद करीत आपल्या संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी शेवटपर्यंत राहिल्याने सामना पोलीस संघाने २-० असा जिंकला. (प्रतिनिधी)शनिवारी होणारे सामने-दु .२:०० वाजता - शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार ‘अ’ दु. ४:०० वाजता - संध्यामठ विरुद्ध साईनाथ स्पोर्टस्.शुक्रवारी सामने होणार नाहीत.