शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे कार्य तरुणांना प्रेरक दिवाकर रावते : बाबासाहेब पाटील-सरूडकर यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:01 IST

सरूड : संयमी बाबासाहेबांनी दुर्गम भागात केलेले कार्य तरुण नेतृत्वाला प्रेरक आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारे आमदार सत्याजित पाटील यांना समाजाच्या प्रश्नाची चांगली जाण आहे.

सरूड : संयमी बाबासाहेबांनी दुर्गम भागात केलेले कार्य तरुण नेतृत्वाला प्रेरक आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणारे आमदार सत्याजित पाटील यांना समाजाच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. त्याचे प्रत्यंतर आम्ही विधानसभेत पाहतो. आक्रमकपणे एखाद्या प्रश्नाची उकल व त्याचा पाठपुरावा हा बाणा नेतृत्वाला उभारी देणारा आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले.

सरूड (ता. शाहूवाडी) येथे माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर दादा यांच्या अमृमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या.

यावेळी गौरव समितीच्यावतीने माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर व त्यांच्या सुविद्य पत्नी अनुराधा पाटील यांचा सत्कार परिवहन खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते केला. यावेळी विश्वास उद्योग समूहाचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी उद्योग समूहाच्यावतीने मानपत्र, शाल, श्रीफळ, चांदीची मूर्ती देऊन त्यांना गौरविले. तसेच सरूडकरांच्या कार्यावरील ‘अमृत गंध’ या पुस्तकाचे प्रकाशन विश्वास उद्योग समूहाचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते केले.

माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या, शाहूवाडीसारख्या डोंगराळ भागात दादांचे कार्य व संपर्क मोठा आहे. चौफेर विकासात त्यांचे काम दीपस्तंभासारखे आहे.मानसिंगराव नाईक म्हणाले, सहकारातील दादांचे नेतृत्व आम्हाला प्रेरणादायी आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संधी मिळालेल्या बाबासाहेब पाटील यांनी कर्तृत्वसिद्ध अभ्यासू प्रतिमेची छाप सोडली.

उदय साखरचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड म्हणाले, जेव्हा जेव्हा सत्यजित पाटील आमदारकीला उभे राहतील तेव्हा तेव्हा मी सरूडकरांच्या पाठीशी राहून तालुक्यातील आमदारकी कायम राहील.आमदार सत्यजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी खासदार कल्लाप्पण्णा आवाडे, आमदार संध्यादेवी कुपेकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, माजी आमदार राऊ धोंडी पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील (कळेकर), बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, अपना बाजारच्या अध्यक्षा सुनीतादेवी नाईक, जि. प. सदस्य विजय बोरगे, आकांक्षा पाटील, हंबीरराव पाटील, सभापती डॉ. स्नेहा जाधव, उपसभापती दिलीप पाटील, सुजाता इंगळे, सूर्याजी इंगळे, प्राजक्ता पाटील, प्रीतम पाटील, सरपंच राजकुंवर पाटील, दत्तप्रसाद पाटील, भाई भारत पाटील, युवा नेते रणवीर गायकवाड, डी. जी. पाटील (कोतोली), आदी मान्यवर उपस्थित होते.माझ्यावर सामान्य कार्यकर्त्यांचे ऋणसत्काराला उत्तर देताना माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर म्हणाले, डोंगराळ भागातील सामान्य कार्यकर्त्यांनी मला डोक्यावर घेतले. ते ऋण माझ्यावर आहे. उदयसिंगराव गायकवाड यांनी मला राजकारणात आणले. बाळासाहेब माने यांनी मला काम करण्याची संधी दिली. सामान्यांच्या विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी सत्यजित यांच्या मागे ठाम राहाल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्नी अनुराधा हिचे मोठे पाठबळ राहिल्याने सरूडकरांचा भक्कम पाठिंबा प्राप्त करू शकलो, असे त्यांनी स्पष्ट केले.सरूड (ता. शाहूवाडी) येथे अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी डावीकडून शेकापचे जिल्हा सरचिटणीस भारत पाटील, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, दगडू पाटील, माजी उपसभापती नामदेव पाटील-सावेकर, आमदार सत्यजित पाटील-सरुडकर, जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील, पं.स. सभापती डॉ. स्नेहा जाधव, जि. प. सदस्या आकांक्षा पाटील, उपसभापती दिलीप पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील आदी उपस्थित होते.