शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

बदलला पक्ष तरी आमदारकी फिक्स; कोल्हापूर जिल्ह्यात सहा जणांना मिळाले यश

By पोपट केशव पवार | Updated: October 25, 2024 19:14 IST

पोपट पवार कोल्हापूर : उमेदवारापेक्षा पक्ष कोणता हे पाहून अनेक मतदार आपला कौल ठरवत असतात. त्यामुळे उमेदवारांनी इकडून तिकडे ...

पोपट पवारकोल्हापूर : उमेदवारापेक्षा पक्ष कोणता हे पाहून अनेक मतदार आपला कौल ठरवत असतात. त्यामुळे उमेदवारांनी इकडून तिकडे उड्या मारणे अनेकांना रुचत नाही. निकालात याची प्रचिती राज्यात बहुतांश मतदारसंघांत दिसते. काही मतदारसंघ मात्र याला अपवाद आहेत. उमेदवाराने निवडणुकीत पक्ष बदलल्यानंतरही कोल्हापूर जिल्ह्यातील सहा उमेदवारांनी गुलाल घेतला आहे. बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर, सदाशिवराव मंडलिक, अमल महाडिक, उल्हास पाटील यांनी पक्ष बदलूनही जनतेने त्यांना दुसऱ्या पक्षातून उभे राहिल्यानंतर विधानसभेत पाठवले आहे.खानविलकर यांना राष्ट्रवादीतून यशदिग्विजय खानविलकर हे १९८०, ८५, ९० व ९५ असे चारवेळा काँग्रेसमधून आमदार होते. शरद पवार यांचे ते जवळचे निकटवर्तीय. १९९९ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुढे १९९९ला त्यांनी राष्ट्रवादीतून विजय प्राप्त केला.

‘हात’ सोडून घड्याळावरही कुपेकरांची जादूगडहिंग्लजमधून १९९५ला काँग्रेसच्या चिन्हावर विधानसभेत गेलेले बाबासाहेब कुपेकर यांनी १९९९ला राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधत निवडणूक लढवली. पक्ष बदलूनही गडहिंग्लजकरांनी त्यांना गुलाल लावला.

सदाशिव मंडलिक यांचा करिष्माकागल मतदारसंघातून १९७२ला अपक्ष विजय मिळवलेल्या सदाशिवराव मंडलिक यांनी १९८५ मध्ये एस काँग्रेसकडून विधानसभा गाठली. पुढे १९९० व १९९५ला त्यांनी काँग्रेस आयमधून विजय मिळवला. विशेष म्हणजे काँग्रेसला रामराम करत ते १९९९ व २००४ला राष्ट्रवादीकडून लोकसभेत गेले. पुढे २००९ला अपक्ष विजय मिळवत त्यांनी पक्षापेक्षा स्वत:चाच करिष्मा असल्याचे सिद्ध केले होते.

ऐनवेळी भगवा घेत उल्हास पाटील यांचा विजयशिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कार्यरत असणाऱ्या उल्हास पाटील यांनी २०१४ मध्ये निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश करत विजय मिळवला होता. स्वाभिमानीचा झेंडा सोडून ऐनवेळी भगवा खांद्यावर घेत त्यांनी मिळवलेला विजय पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चिला गेला.

अमल महाडिक यांचा विजय

अमल महाडिक हे २०१४च्या निवडणुकीआधी काँग्रेसकडून भादोले (ता. हातकणंगले) जिल्हा परिषदेचे सदस्य होते. निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून विजयश्री प्राप्त केली.

कोरे, पाटील यांची बाजीचंदगडमूधन १९९०ला काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत गेलेले नरसिंग पाटील हे १९९९ला राष्ट्रवादीकडून तर २००४ला ‘जनसुराज्य’कडून लढले व विजयी झाले. १९९९ला राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून पन्हाळा मतदारसंघातून विजयी झालेले विनय कोरे पुढे २००४ला स्वत:च्या जनसुराज्यकडून आमदार झाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणkolhapur-north-acकोल्हापूर उत्तरPoliticsराजकारण