शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भ. आदिनाथांच्या मूर्तीवर मस्तकाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 01:17 IST

कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील महास्वामी लक्ष्मीसेन जैन मठातील श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी बृहन्मूर्तीवर रविवारी सायंकाळी ५७वा वार्षिक महामस्तकाभिषेक करण्यात आला. भक्तिपूर्ण वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. भ. चंद्रप्रभू तीर्थकरांचा पंचामृत अभिषेक व महाशांतिमंत्राचे पठण करण्यात आले. सकाळी सहा वाजता मंगलवाद्य घोष आणि ध्वजारोहण करण्यात आले.भट्टारकरत्न पट्टाचार्य ...

कोल्हापूर : शुक्रवार पेठेतील महास्वामी लक्ष्मीसेन जैन मठातील श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर यांच्या २८ फुटी बृहन्मूर्तीवर रविवारी सायंकाळी ५७वा वार्षिक महामस्तकाभिषेक करण्यात आला. भक्तिपूर्ण वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. भ. चंद्रप्रभू तीर्थकरांचा पंचामृत अभिषेक व महाशांतिमंत्राचे पठण करण्यात आले. सकाळी सहा वाजता मंगलवाद्य घोष आणि ध्वजारोहण करण्यात आले.भट्टारकरत्न पट्टाचार्य स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या अधिपत्याखाली आणि मुडबिद्री (कर्नाटक) येथील भट्टारक पट्टाचार्य जगद्गुरू स्वस्तिश्री डॉ. चारूकीर्ती महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी महामस्तकाभिषेक करण्यात आला. यावेळी पंचामृत अभिषेक, दुग्धाभिषेक, इक्षुरसाभिषेक, कलकचूर्ण, कुंकुमाभिषेक, कशायद्रव्य, हळदाभिषेक, सर्वौषधी, चतुष्कोन, अष्टगंध, पुष्पावृष्टी, शांतिकलश असा महामस्तकाभिषेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जैन सेवा संघाने महाआरती केली. पंडित राजू उपाध्ये, शशिकांत उपाध्ये आणि प्रशांत उपाध्ये यांनी पौरोहित्य केले. याप्रसंगी अभयकुमार इंगळे, रूपाली पाटील, राजेंद्र मकोटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय कोठावळे, विद्याधर चौगुले, सतीश पत्रावळे, भरत वणकुद्रे, अभय भिवटे, अजित सांगावे, कोल्हापूर, मुंबई, पुणे, कर्नाटकातील श्रावक उपस्थित होते.ज्ञान मिळविण्यासह संयमाची गरज :चारुकीर्ती महास्वामीक्रोध, लोभ, माया, मत्सर हे नष्ट करण्यासाठी कोणत्याही शस्त्राची नाही, तर संयमाची गरज आहे. विविध स्वरूपांतील ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. जैन समाजाच्या तत्त्वप्रणालीप्रमाणे समाजाने आचरण करणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन मुडबिद्री (कर्नाटक) येथील जगद्गुरू स्वस्तिश्री डॉ. चारूकीर्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी रविवारी येथे केले.येथील शुक्रवार पेठेतील महास्वामी श्री लक्ष्मीसेन जैन मठातर्फे आयोजित ‘आदर्श दाम्पत्य’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जैन भवनमधील या कार्यक्रमास स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात अ‍ॅड. कुुंतीनाथ आणि प्रा. कांचनताई कापसे यांना स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते ‘आदर्श दाम्पत्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, दुपट्टा, हार, शास्त्र, मानपत्र आणि ११ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन महास्वामी म्हणाले, अ‍ॅड. कापसे यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य हे प्रेरणादायी ठरणारे आहे. या कार्यक्रमाचा प्रारंभ सामुदायिक ‘णमोकार’ महामंत्राने झाला. कोलकाता येथील पारसकुमार आणि गुणमाला पांड्या यांचा विशेष सन्मान प्रा. डी. ए. पाटील आणि विमलाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट यांचा सत्कार प्रा. कांचनताई कापसे यांच्या हस्ते झाला. दिगंबर जैन बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे यांनी स्वागत केले. प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. पी. आर. पाटील यांनी कापसे दाम्पत्याचा परिचय करून दिला. प्रा. गोमटेश पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय मगदूम यांनी आभार मानले.