शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

जाणता लोकनेता, प्रकाशआण्णा आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:22 IST

जमलेल्या गर्दीचा नेतेगिरीसाठी उपयोग करून घेऊन आपली उंची वाढविणारे नेते आजकाल सर्वत्र दिसतात; पण अशा सवंग पुढारीपणाचा बुडबुडा फार ...

जमलेल्या गर्दीचा नेतेगिरीसाठी उपयोग करून घेऊन आपली उंची वाढविणारे नेते आजकाल सर्वत्र दिसतात; पण अशा सवंग पुढारीपणाचा बुडबुडा फार काळ टिकत नसतो. लोक समुदायांच्या वेगवेगळ्या समस्यांच्या लाटेत अशा कथित नेत्यांचे पितळ उघडे पडते. अर्थात विकासकार्याची जाण, दूरदृष्टी आणि दीर्घकालीन लोकनेतृत्वासाठी अहोरात्र वेचावे लागणारे कष्ट करून विधायक कार्यातून आपले नेतृत्व सिद्ध करणारे प्रकाशआण्णा आवाडे यांच्यासारखे नेतृत्व हे पश्चिम महाराष्ट्राला लाभलेले एक वरदान म्हणावे लागेल. कल्लाप्पाण्णा आवाडेदादांसारख्या सहकाराचा डोंगर उभारून विधायक कार्याला वाहून घेणाऱ्या पित्याच्या सहवासात प्रकाशआण्णांना लोकसेवेचे बाळकडू मिळाले. कै. दत्ताजीराव कदम, कै. बाबासाहेब खंजिरे, कै. अनंतराव भिडे, आदी दिग्गज नेत्यांची निरपेक्ष कार्यपद्धती प्रकाशआण्णांनी जवळून पाहिली. पक्ष संघटनेसाठी समर्पितपणे कार्य करणारे पु. बा. सुभेदारकाका व मल्हारपंत बावचकर यांच्यासारख्या प्रभुतींमुळे आण्णांमध्ये एक सालस व शिस्तबद्ध कार्यकर्ता घडत गेला.

इचलकरंजीतील राजकीय चळवळीला केवळ पक्षीय अभिनिवेश नव्हता, तर सहकाराच्या स्पर्शाने ती चळवळ विधायक अंगाने बहरत होती. म्हणूनच व्यक्तीपेक्षा संघटनेला अधिक महत्त्व देणारे आणि संघटनेपेक्षाही लोककल्याणाला वाहून घेणारे कार्यकर्ते येथील राजकीय पटलावर तयार होत गेले. अशा सार्वजनिक कार्यकर्त्याच्या मजबूत मुशीत तयार झालेले प्रकाशआण्णा लोकसेवेला प्रमाण मानून राजकारण करताना दिसतात.

अचानकपणे आणि अगदी अनपेक्षितपणे लाभलेल्या आमदारकीचा त्यांनी आपल्या आगळ्या कार्यशैलीतून आदर्श वस्तूपाठ निर्माण केला. स्वत:च्या पक्षाचे सरकार सत्तेत असताना येथील यंत्रमाग व्यवसायाची दुरवस्था पाहून आंदोलन करताना पक्षशिस्तीची पर्वा त्यांनी केली नाही. अन्यायाला वाचा फोडताना सत्याची बाजू घेऊन रस्त्यावर उतरलेल्या आणि प्राणाची पर्वा न करता आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमरण उपोषणाला बसलेल्या प्रकाशआण्णांची ती धडाडी इचलकरंजीच्या नागरिकांनी विसरलेली नाही. तरुण मित्रांना घेऊन पदयात्रेतून विधानसभा मतदारसंघातील गावांना भेटीतून वास्तवाचा अभ्यास करणारे प्रकाशआण्णा आपल्या कृतीतून लोकांच्या गळ्यातील ताईत बनले.

अल्पावधीत मिळालेल्या मंत्रिपदाचा परिसर विकासासाठी केलेला उपयोग आणि इचलकरंजीच्या पाणीपुरवठा योजनांपासून वाड्या-वस्त्यांतील रस्त्यापर्यंत त्यांच्या विकासाचा आलेख शब्दात पकडणे कठीण आहे. रखडलेल्या कृष्णा पाणी योजनेला गती देत असतानाच गैबी बोगद्यातून इचलकरंजीसाठी पाण्याची तरतूद करुन पंचगंगा प्रवाहित ठेवण्याचा प्रकाशआण्णांचे द्रष्टेपण तोंडाला येईल ते बोलणाऱ्यांनी अभ्यासून पाहावे. चार-चार वेळा लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळण्यामागे प्रकाशआण्णांचे हे विकासाठीचे झपाटलेपण होते.

इचलकरंजीच्या न्यायालयाच्या वास्तूपासून क्लस्टर योजनेतून शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यापर्यंत त्यांनी सामावलेले कार्य सामान्यांच्या कल्पनेपलीकडील आहे. सीईटीपीपासून महिला गारमेंट प्रशिक्षणापर्यंत त्यांनी राबविलेल्या अभिनव योजनांची पाहणी करण्यासाठी उभ्या महाराष्ट्रातून जिज्ञासूंची रीघ लागली होती. दादांच्या सहकारी संस्थांच्या अडीअडचणी सोडवितानाच 'जवाहर'ची उभारणी ते 'डीकेटीई'सारख्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेची निर्मिती यामागे प्रकाशआण्णांचा कर्तृत्वशाली हात आहे, हे सर्वश्रुत आहे.

देशातील आणि राज्यातील राजकीय क्षितिजावर उलाथापालथ होत असताना या नेत्यास म्हणावे तसे पाठबळ संघटनेकडून मिळत नव्हते. जातीयवादी शक्ती अधूनमधून तोंड काढत होत्या. प्रकाशआण्णांना अशा एका गाफीलप्रसंगी पराभवाला सामोरे जायला लागून तब्बल दहा वर्षांनी इचलकरंजीच्या विकासाला अडसर निर्माण झाला. दरम्यान, प्रकाशआण्णांचे राजकारणात पुनरागमन होईल की नाही इतपत अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात असतानाच पक्षाची वस्त्रप्रावरणे बाजूला सारून हा नेता महापुराने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना मदतीसाठी जिवाचे रान करत होता. पक्षापेक्षा सेवा आणि प्रसिद्धीऐवजी लोककल्याणचा वसा या ध्येयाने प्रेरित झालेल्या प्रकाशआण्णांचे कार्य पुनश्च रुजले. म्हणूनच गेल्या निवडणुकीत त्यांना पुन्हा आमदारकीचा बहुमान जनतेने मिळवून दिला.

ताराराणी पक्षाच्या माध्यमातून विधायक विचार आणि विकासाचा निर्धार घेऊन लोककल्याणासाठी झटणारे प्रकाशआण्णा हेच मुळी एक राजकीय पक्ष आहेत. ते कुठेही असोत त्यांच्या कार्यामागे सर्वसामान्यांचे, महिलांचे, वंचितांचे, विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांचे कल्याण केंद्रस्थानी असते याची लोकांना खात्री झाली आहे. म्हणूनच या जाणत्या लोकनेतृत्वाला वाढदिवसाच्या शुभकामना देताना त्यांच्या समर्पित कार्याच्या दिंडीत सहभागी होण्याची लाभलेली संधी आम्हा सार्वजनिक कार्यकर्त्यांसाठी अधिक मोलाची वाटते

प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे,

अध्यक्ष, ताराराणी पक्ष इचलकरंजी विधानसभा