शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

कवठेगुलंदच्या आरोग्य केंद्राची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: October 6, 2015 23:50 IST

वीस वर्षांपासून प्रलंबित होता प्रश्न : इमारत बांधकामासाठी चार कोटींचा निधी मंजूर

संदीप बावचे - जयसिंगपूर  शिरोळ तालुक्यात दोन ग्रामीण रूग्णालये, सात प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक जिल्हा परिषद दवाखाना व ३३ उपकेंद्रे आहेत. नव्याने जयसिंगपूरला ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे. उदगावला प्राथमिक आरोग्य केंद,्र तर चिंचवाडला उपकेंद्र होणार आहे. कवठेगुलंदचा २० वर्षांपासूनचा प्रश्न निकालात निघाल्यामुळे शिरोळ तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला गती प्राप्त होणार आहे. शासकीय आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांचा पाठपुरावा ‘लोकमत’ने सुरू केला आहे.लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांचा पूर येतो. मात्र, हे आश्वासन तडीस लावल्याचे उदाहरण कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथे तब्बल २० वर्ष प्रतीक्षेत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीतुन दिसून आले. या आरोग्य केंद्रासाठी एक कोटी ९० लाखांचा निधीही मिळाला आहे. केवळ जागा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे करण्याची तांत्रिक अडचण असली, तरी याचा पाठपुरावा, लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे. एकूणच कवठेगुलंदसह सात गावांतील नागरिकांना सर्वसोयीनीं युक्त असे प्राथमिक आरोग्य केंद्र येणाऱ्या काळात मिळणार आहे, हे मात्र निश्चित.कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम् सुफलाम् बनला आहे. पावसाळ्यात दळणवळणाचा प्रश्न निर्माण होत असल्याने नृसिंहवाडी-औरवाड जुन्या पुलाला पर्यायी पूल बांधावा, अशी मागणी जोर धरल्यानंतर व सन २००५-०६ साली महापूर येऊन गेल्यानंतर खऱ्या अर्थाने हा प्रश्न सुटला. नदी पलीकडील औरवाडसह, गौरवाड, बुबनाळ, आलास, शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी या सात गावांना नवीन पुलामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच शासकीय आरोग्य सुविधा मिळावी, कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे, यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न गेली २० वर्षे कागदावरच राहिला होता. आरोग्य केंद्र मंजूर आहे. मात्र, कार्यवाही होत नसल्याने हा प्रश्न ‘जैसे थै’ असाच होता. उपकेंद्र असले, तरी तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांअभावी रुग्णांना सुविधा मिळण्यास अडचणी ठरतात. यामुळे नदी पलीकडील नागरिकांना एकतर नृसिंहवाडी, कुरुंदवाड अथवा जयसिंगपूरकडे उपचारासाठी जावे लागते. पावसाळ्यात तर नाहक त्रास सहन करावा लागतो. लोकप्रतिनिधींकडून कवठेगुलंद येथे आरोग्य केंद्र होण्याबाबत आश्वासनांचा पूरच आतापर्यंत पाहायला मिळाला होता. आरोग्य केंद्र मंजूर असताना, कार्यवाही का होत नाही, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात असतानाच आलासच्या जिल्हा परिषद सदस्या सुनंदा दानोळे व माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर कवठेगुलंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी एक कोटी ९० लाखांचा निधी मिळाला असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे जागा करण्याची तांत्रिक अडचण इतकीच बाब आहे.कवठेगुलंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहे. या आरोग्य केंद्राला निधी मंजूर झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अधिकृत कर्मचारी स्टाफ नियक्तीबाबत कोणतेही आदेश नाहीत. आदेश आल्यानंतर कार्यवाही केली जाईल. - डॉ. प्रसाद दातार, तालुका वैद्यकीय अधिकारीलवकरच कामाला सुरुवातगेल्या वीस वर्षांपासून कवठेगुलंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे भिजत घोंगडे पडले होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला आहे. जागा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे करण्याची तांत्रिक अडचण असली, तरी आमचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दुर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती जि. प. सदस्या सुनंदा दानोळे यांनी दिली.