शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग वीजदर सवलतीबाबत टाळाटाळ

By admin | Updated: March 23, 2015 00:41 IST

प्रताप होगाडे : ऊर्जामंत्र्यांनी वीजदर सवलतीचा चेंडू आयोगाच्या कोर्टात ढकलला

इचलकरंजी : शासनाने कृषी पंपांना पुरविण्यात येणाऱ्या विजेसाठी सवलतीचा दर राहील, असे डिसेंबरमध्ये घोषित केले होते. तसेच यंत्रमाग उद्योगालाही वीजदराची सवलत ठेवण्यात येईल, असे जाहीर करणे आवश्यक होते; पण यंत्रमाग उद्योजकांनी ऊर्जा नियामक आयोगाकडे स्वतंत्र वर्गवारीची मागणी करावी, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचित करून वीजदर सवलतीचा चेंडू आयोगाच्या कोर्टात ढकलला आहे, अशी टीका वीज ग्राहक व औद्योगिक संघटनांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत केली.ऊर्जामंत्र्यांनी यंत्रमाग वीजदर सवलतीचा निर्णय केला नसल्याने डिसेंबर ते एप्रिल असे पाच महिने वाढलेल्या वीजदराचा भुर्दंड यंत्रमागधारकांना सोसावा लागणार आहे, असे स्पष्ट करीत होगाडे म्हणाले, भाजपचे शासन सत्तेवर येताच त्यांनी वीजदराच्या सवलतीचे अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, नोव्हेंबर महिन्यापासून वाढीव वीजदराची बिले सर्वच ग्राहकांना येऊ लागली. त्यावेळी राज्यभर उद्योजक व वीज ग्राहकांचे आंदोलन झाले. तेव्हा हिवाळी अधिवेशनात वीजदराचे अनुदान चालू ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, हे अनुदान एकाच महिन्याचे असल्याचे जानेवारीमध्ये स्पष्ट झाले. तेव्हापासून राज्यातील यंत्रमागधारकांसह सर्व उद्योजक आंदोलन करीत आहेत; पण सरकार मात्र याकडे गांभीर्याने पाहत नाही.यंत्रमाग उद्योगासाठी स्वतंत्र वर्गवारी असावी, म्हणून यापूर्वीसुद्धा ऊर्जा आयोगाकडे यंत्रमागधारक संघटनांनी मागणी केली होती; पण त्यावेळी महावितरण व शासनाने पाठिंबा दिला नसल्याने आयोगाकडून यंत्रमाग उद्योजकांची ही मागणी फेटाळण्यात आली होती. हे सरकार आता यंत्रमाग उद्योजकांना स्वतंत्र वर्गवारी आयोगाकडे मागा, असे सांगत आहे, असे सांगून होगाडे यांनी ऊर्जामंत्री केवळ फार्स करीत असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)यंत्रमागाची नवीन दरवाढ निश्चितनुकत्याच जाहीर झालेल्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात यंत्रमाग उद्योगाच्या वीजदर सवलतीसाठी १२३२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गतवर्षी वीजदर सवलतीसाठी ११०० कोटी रुपये शासनाने महावितरणला दिले होते. या पार्श्वभूमीवर सध्याची केलेली तरतूद ही गतवर्षी इतकाच यंत्रमागाचा वीजदर राहील; पण महावितरणने नव्याने मागितलेली ३२ टक्के वीजदर वाढ पुन्हा यंत्रमाग उद्योगाच्या बोकांडी बसेल, असेही प्रताप होगाडे यांनी सांगितले.