शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांत २२ लाख वीज मीटर होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 00:29 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दोन महिन्यांपासून राज्यभरात घरगुती वीज मीटरचा खडखडाट झाल्याने ग्राहकांतून ‘महावितरण’बाबत संतापाची लाट उमटत होती; पण ‘महावितरण’मार्फत राज्यातील ग्राहकांसाठी सुमारे २२ लाख मीटरची मागणी नोंदविली आहे; त्यानुसार संबंधित मान्यताप्राप्त कंपन्यांकडून वीज मीटर पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने ही मीटर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील ...

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दोन महिन्यांपासून राज्यभरात घरगुती वीज मीटरचा खडखडाट झाल्याने ग्राहकांतून ‘महावितरण’बाबत संतापाची लाट उमटत होती; पण ‘महावितरण’मार्फत राज्यातील ग्राहकांसाठी सुमारे २२ लाख मीटरची मागणी नोंदविली आहे; त्यानुसार संबंधित मान्यताप्राप्त कंपन्यांकडून वीज मीटर पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. टप्प्याटप्प्याने ही मीटर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील सर्व विभागांत येत आहेत. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर विभागासाठी (कोल्हापूर व सांगली जिल्ह्णांसाठी) सुमारे चार हजार मीटर उपलब्ध झाली आहेत. ‘महावितरणकडे घरगुती मीटरचा खडखडाट’ या मथळ्याखाली ‘लोकमत’कडे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ‘महावितरण’चे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यानंतर त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर अनेक विभागीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांनी वीज मीटर उपलब्धतेबाबत महावितरणच्या वेबसाईटवर अद्ययावत माहिती भरली नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आढावा घेऊन मीटर उत्पादकांकडे तातडीने मागणी करण्यात आहे.महावितरणकडून फेब्रुवारी २०१८ मध्ये पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्णांसाठी सिंगल फेजची १ लाख ७५ हजार नवीन घरगुती वीजमीटर उपलब्ध झाली होती; पण ही मीटर जून महिन्याच्या प्रारंभीच संपली. त्यानंतर प्रत्येक कार्यालयात वीज मीटर मागणीसाठी ग्राहकांच्या चकरा सुरू झाल्या.गेले दोन महिने प्रत्येक विभागीय व शाखा कार्यालयात वीज मागणी अर्जांचे गठ्ठे वाढू लागले; पण त्या तुलनेत मीटरचा तुटवडा भासल्याने अधिकाºयांना ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर राज्यभरातील मागणीबाबत आढावा घेऊन त्याबाबत अधिकृत पाच कंपन्याकडे २२ लाख मीटरची मागणी नोंदविली. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही मीटर येणार आहेत.दोन कंपन्यांची मीटर दोषयुक्त‘महावितरण’ कंपनीकडून राज्यभरात मान्यताप्राप्त सात कंपन्यांकडून वीज मीटर उत्पादन करून घेतले जाते; पण गेल्या वर्षभरात दोन कंपन्याकडून वितरण झालेल्या बहुतांश मीटरमध्ये दोष आढळले. या दोन कंपन्यांच्या मीटरमुळे अनेकांची बिले अवाढव्य येऊ लागली, मीटर बंद पडू लागली. त्यामुळे या दोन कंपन्यांना काळ्या यादीत टाकले व त्या कंपन्यांची दोषी सर्व मीटर बदलून, त्या ठिकाणी फक्त एलएनटी, जीनस, पालमोहर, हिमाचल, एचपीएल या पाच कंपन्यांची मीटर बसविली. त्यामुळे मीटरचा तुटवडा भासू लागला.‘चोवीस तासांत नवीन वीज कनेक्शन, नादुरुस्त मीटर महिन्याभरात बदला’ या महावितरण कंपनीने जाहीर केलेल्या योजनेच्या घोषवाक्याचा गेल्या दोन महिन्यांत पुरता बोजवारा उडाला होता. मीटर उपलब्ध नसल्याने सर्वच उपविभागीय कार्यालयांत मीटरचा तुटवडा भासत होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत कोल्हापूर व सांगली जिल्ह्णांसाठी चार हजार मीटर उपलब्ध झाली आहेत. आणखी मीटर पुढील आठवड्यात येत आहेत.