शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद, नांदेड विद्यापीठासह दहा संघ पुढील फेरीत-विद्युतझोतात रंगला अकरा सामन्यांचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:00 IST

प्रतिस्पर्धी संघांना नमवून औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठासह दहा संघांनी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेतील पुढील फेरी मंगळवारी गाठली. त्यातील चार संघांना पुढे चाल मिळाली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातील पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा; चार संघांना पुढे चाल

कोल्हापूर : प्रतिस्पर्धी संघांना नमवून औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठासह दहा संघांनी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेतील पुढील फेरी मंगळवारी गाठली. त्यातील चार संघांना पुढे चाल मिळाली. शिवाजी विद्यापीठातील लोककला केंद्रात या स्पर्धा होत आहेत.

या स्पर्धेत मंगळवारी सकाळच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मणिपाल विद्यापीठावर ६३-०६ अशा गुणांनी एकतर्फी विजय मिळविला. स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाने गुजरात विद्यापीठावर ४१-१२ अशा गुणांनी मात केली. अन्य निकाल असा : वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठ विजयी विरूद्ध (वि. वि.) गांधीनगरचे स्वर्णीम गुजरात क्रीडा विद्यापीठ (४१-३८), एल.एन.आय.पी.ई. विद्यापीठ, ग्वाल्हेर वि.वि. संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक (५६-३१), मोहनलाल सुखोडिया विद्यापीठ, उदयपूर वि.वि. राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर (५८-१९), गोवा विद्यापीठ, पणजी वि.वि. पॅसिफिक अकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन एन्ड रिसर्च, उदयपूर (४१-३०), हेमचंद्र उत्तर गुजरात विद्यापीठ, पाटण (गुजरात) वि.वि. सरदार पटेल विद्यापीठ, वल्लभ विद्यानगर, गुजरात (३५-२६), राजस्थान विद्यापीठ, जयपूर वि.वि. महाराज गंगासिंह विद्यापीठ, बिकानेर (४२-४०). दरम्यान, मध्यप्रदेशमधील महाराजा छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ (छत्रपूर), सौराष्ट्र विद्यापीठ (राजकोट), महाराज सूरजमल ब्रिज विश्वविद्यालय विद्यापीठ(भरतपूर), राजीव गांधी विद्यापीठ( भोपाळ) या संघांना पुढे चाल मिळाली.विद्युतझोतात रंगला अकरा सामन्यांचा थरारया स्पर्धेच्या उदघाटनानंतर काल (सोमवारी) अकरा सामन्यांमध्ये कबड्डीचा थरार रंगला. त्यामध्ये भारती विद्यापीठ (पुणे), गुजरात टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ(अहमदाबाद), देवी अहिल्या विद्यापीठ(इंदोर), कोटा विद्यापीठ (कोटा), भूपाल नोबल विद्यापीठ (राजस्थान), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली), बरकतुल्ला विद्यापीठ (भोपाळ), विक्रम विद्यापीठ (उज्जैन), गुजरात विद्यापीठ (अहमदाबाद), पारुल विद्यापीठ (गुजरात), राणी दुर्गावती विद्यापीठ (जबलपूर) यांनी संघांनी विजय मिळविला.फोटो (२७११२०१८-कोल-कबड्डी (गोवा उदयपूर), ०१ : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मंगळवारी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत गोवा विद्यापीठाने उदयपूरच्या पॅसिफिक अकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन एन्ड रिसर्चवर अकरा गुणांनी विजय मिळविला. (छाया : नसीर अत्तार)फोटो (२७११२०१८-कोल-कबड्डी (जयपूर राजस्थान), ०१ : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात मंगळवारी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेतील राजस्थान विद्यापीठ जयपूर आणि महाराज गंगासिंह विद्यापीठ बिकानेर यांच्या सामन्यातील एक चुरशीचा क्षण. (छाया : नसीर अत्तार) 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूरKabaddiकबड्डी