शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

महापौरांच्या राजीनाम्याकडे लक्ष

By admin | Updated: February 9, 2015 00:35 IST

आज मनपाची सभा : राजीनामा न देण्यासाठी ‘राष्ट्रवादीं’चा एक गट सक्रीय

कोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी ठरल्याप्रमाणे आज, सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत राजीनामा देणार की याकडे काँग्रेससह सर्वच नगरसेवकांना लक्ष लागून राहिले आहे. महापौरांनी राजीनामा न दिल्यास सभागृहास त्यांच्या विरोधात काहीही कारवाई करता येणार नाही. त्यामुळे महापौरांच्या राजीनाम्याबाबत कमालीची उत्कंठा लागली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी महापौर राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले तरी राष्ट्रवादीतील एक गट महापौरांचा राजीनामा होऊ नये, यासाठी सक्रिय झाल्याने काँग्रेस गटात कमालीची अस्वस्थता दिसत आहे.लाचखोरीच्या संशयात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी गुरुवारी अटक व जामीन मंजूर झाल्यानंतर पदाचा तूर्त राजीनामा देणार नसल्याचे विधान केले. त्या ठाम राहिल्यास त्यांना पदावरून कोणीही हटवू शकणार नाही. त्यामुळे महापौरपदाची संधी असलेल्या काँग्रेस नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. महापौरांनी ठरल्याप्रमाणे सोमवारच्या सभेत राजीनामा देतील, असे खुद्द मुश्रीफ यांनी सांगितल्याने कॉँग्रेसमधील तणाव काहीसा निवळला आहे. मात्र, राष्ट्रवादीतील एक गट राजीनामा होऊ नये यासाठी सक्रिय झाला. महापौरांच्या राजीनाम्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)महापौरांच्या राजीनाम्याकडे लक्षआज मनपाची सभा : राजीनामा न देण्यासाठी ‘राष्ट्रवादीं’चा एक गट सक्रीयकोल्हापूर : महापौर तृप्ती माळवी ठरल्याप्रमाणे आज, सोमवारी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत राजीनामा देणार की याकडे काँग्रेससह सर्वच नगरसेवकांना लक्ष लागून राहिले आहे. महापौरांनी राजीनामा न दिल्यास सभागृहास त्यांच्या विरोधात काहीही कारवाई करता येणार नाही. त्यामुळे महापौरांच्या राजीनाम्याबाबत कमालीची उत्कंठा लागली आहे. आमदार हसन मुश्रीफ यांनी महापौर राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले तरी राष्ट्रवादीतील एक गट महापौरांचा राजीनामा होऊ नये, यासाठी सक्रिय झाल्याने काँग्रेस गटात कमालीची अस्वस्थता दिसत आहे.लाचखोरीच्या संशयात अडकलेल्या महापौर तृप्ती माळवी यांनी गुरुवारी अटक व जामीन मंजूर झाल्यानंतर पदाचा तूर्त राजीनामा देणार नसल्याचे विधान केले. त्या ठाम राहिल्यास त्यांना पदावरून कोणीही हटवू शकणार नाही. त्यामुळे महापौरपदाची संधी असलेल्या काँग्रेस नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. महापौरांनी ठरल्याप्रमाणे सोमवारच्या सभेत राजीनामा देतील, असे खुद्द मुश्रीफ यांनी सांगितल्याने कॉँग्रेसमधील तणाव काहीसा निवळला आहे. मात्र, राष्ट्रवादीतील एक गट राजीनामा होऊ नये यासाठी सक्रिय झाला. महापौरांच्या राजीनाम्याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसतर्फे महापौरपदासाठी मीना सूर्यवंशी, दीपाली ढोणुक्षे, वैशाली डकरे, अपर्णा आडके, संगीता देवेकर, कांचन कवाळे यांपैकी एकीची वर्णी लागणार आहे. महापौरपदी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने या पदाची खांडोळी करण्याचा पर्याय नेत्यांपुढे आहे. मात्र, दररोज बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीमुळे पहिल्या टप्प्यातच महापौरपद मिळावे, असा इच्छुकांनी तगादा लावल्याचे समजते.महापौरांच्या शेवटच्या सभेत ५०-५० विषय सभेपुढे ठेवण्यात येतात, मात्र, यावेळी माळवी लाचखोरीच्या संशयात अडकल्याने सभेपुढे मोजकेच विषय आहेत. याबाबत काय निर्णय होणार हे सभेतच ठरणार आहे. ‘जनसुराज्य’चे पुन्हा बंडमहापौरपदासाठी डावलल्यानंतरही स्थायी समिती सभापती वर्णी न लागल्याने बंडखोरी केलेल्या जनसुराज्य पक्षाच्या नगरसेविका मृदुला पुरेकर यांनी बंडाचे निशाण यापूर्वीच हाती घेतले आहे. यावेळी महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होऊ न देण्याचा निर्धार माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी केला आहे. त्यामुळे जनसुराज्य स्थायी व परिवहन सभापती निवडणुकीप्रमाणेच महापौर निवडणुकीतही सवता सुभा मांडणार असल्याची चर्चा आहे.