शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

घोसरवाड सरपंच पदाच्या निर्णयाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील घोसरवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कार्यवाहीची अपेक्षा सदस्यांना लागून राहिली आहे. अनुसूचित जमाती महिला ...

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील घोसरवाड ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडून कार्यवाहीची अपेक्षा सदस्यांना लागून राहिली आहे. अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गातील सदस्यच नसल्याने सरपंच पदाची जागा सध्या रिक्त आहे. नुकत्याच झालेल्या सरपंच निवडीत केवळ उपसरपंच निवडण्यात आला असून, आता सरपंच कोण होणार, असा प्रश्न सदस्यांसमोर उभा राहिला आहे.

तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण निघाले होते. घोसरवाड सरपंचपदासाठी अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण निघाले. वास्तविक या ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी निघालेल्या या प्रवर्गातील महिला सदस्यच नसल्याने कोणत्याही सदस्याला सरपंच होता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सदस्य असल्याने सरपंच पदाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, नुकत्याच झालेल्या सरपंच निवडीवेळी हे पद रिक्त राहिले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वच सदस्यांचे लक्ष लागून राहिले आहे.