शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

पक्षकार-वकिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: August 17, 2015 00:47 IST

सर्किट बेंच : आठजणांना अटक, सुटका; गनिमी काव्याने खळबळ

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने शनिवारी, स्वातंत्र्यदिनी उग्र रूप धारण केले. पक्षकार संघटनेचे कार्यकर्ते प्रसाद जाधव, उदय लाड यांच्यासह आठजणांनी जिल्हा व सत्र न्यायालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्यांची धरपकड केल्याने पुढील अनर्थ टळला. गनिमी कावा पद्धतीने केलेल्या या आंदोलनाने खळबळ उडून तणाव निर्माण झाला. आत्मदहन करणाऱ्या आंदोलकांना अटक करून वैद्यकीय तपासणीनंतर वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले. घोषणाबाजी करीत आंदोलन करणाऱ्या ३६ वकिलांनाही ताब्यात घेत काही वेळानंतर सुटका करण्यात आली.कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या सहा जिल्ह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी पक्षकार संघटनेचे कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी जिल्हा न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांसह गुप्तचर यंत्रणेने न्यायालय परिसराची श्वानपथकाद्वारे पाहणी केली होती. त्यावेळी येथील कचराकुंडीत एक पाच लिटरचा रॉकेलचा कॅन हस्तगत करण्यात आला. त्यामुळे शनिवारी सकाळी सहापासून जिल्हा न्यायालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाऊसिंगजी रोड मार्ग बॅरेकेट्स लावून चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. एक पोलीस उपअधीक्षक, सहा पोलीस निरीक्षकांसह १२०हून अधिक वर्दीतील पोलीस व ८०हून अधिक साध्या वेषातील पोलीस ठिकठिकाणी तैनात असल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दल बंबासह रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होेती. सकाळी ७.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एल. अवचट यांच्या हस्ते न्यायालयासमोर ध्वजारोहण होणार होते. तत्पूर्वी ध्वजारोहण कार्यक्रमास येणाऱ्या व्यक्तीची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत होती. ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थित असणाऱ्या वकिलांनी ‘सर्किट बेंचप्रश्नी दिरंगाई करणाऱ्या यंत्रणेचा धिक्कार असो’, अशा जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी आपला मोर्चा तिकडे वळविला. घोषणाबाजी करत वकील न्यायालयाबाहेर येत असतानाच फाटकावरच अचानक पक्षकार संघटनेचे कार्यकर्ते उदय लाड त्यामध्ये सहभागी झाले. त्यांनी आपल्या जवळील बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील रॉकेलची बाटली हस्तगत करत पोलीस व्हॅनकडे नेत असतानाच चिमासाहेब चौकाकडून आलेल्या प्रसाद जाधव यांनीही घोषणाबाजी करत अंगावर रॉकेल ओतून घेतले. पाठोपाठ मनीषा नाईक, सलीम पाच्छापुरे यांनीही रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. पक्षकारांनी अचानक गनिमी कावा पद्धतीने केलेल्या या आंदोलनाने पोलीस पुरते गोंधळून गेले, परंतु प्रसंगावधान राखून त्यांनी आंदोलकांकडील रॉकेलच्या बाटल्या हस्तगत केल्याने पुढील अनर्थ टळला. या सर्वांसह आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्यासह इतर वकिलांनाही पोलीस व्हॅनमध्ये घालून लक्ष्मीपुरी ठाण्यात आणले. त्यानंतर वकिलांनी न्यायालयासमोर घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यांनाही पोलिसांनी टप्प्या-टप्प्याने ताब्यात घेऊन अलंकार हॉल येथे नेले. तोपर्यंत काही वेळांतच वकिलांच्या गर्दीत असणाऱ्या अ‍ॅड. कुलदीप कोरगांवकर यांनीही रॉकेल ओतून घेण्याचा प्रयत्न केला. जागेवर पोलीस व्हॅन नसल्याने त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी अक्षरश: पळवत नेत चिमासाहेब चौकात उभ्या असलेल्या सुमोत कोंबले. त्यामुळे न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. (प्रतिनिधी)आता मुंबईतही उद्रेक गेली तीन वर्षे सर्किट बेंचच्या मागणीसाठी लढा सुरू आहे. राज्य शासनानेही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना याविषयी कळविले आहे; तरीही याबाबत निर्णय घेण्यासाठी जाणून-बुजून दिरंगाई केली जात आहे. त्याचा उद्रेक कोल्हापुरात झाला आहे. येणाऱ्या काळात दिरंगाई करणाऱ्या यंत्रणेच्या दारात वकील व पक्षकार आत्मदहन करतील व मुंबईतही याचा उद्रेक होईल.- अ‍ॅड. विवेक घाटगे, माजी अध्यक्ष, कोल्हापूर बार असोसिएशनआत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांची नावेप्रसाद धनाजीराव जाधव (वय ४५, रा. शाहू बँक चौक, मंगळवार पेठ), उदय आनंदराव लाड (३९, रा. टिंबर मार्केट कमानीजळ, लाड चौक), सलीम मौलासो पाच्छापुरे (४१, रा. प्रगती नगर, पाचगाव रोड), मनीषा बाजीराव नाईक (३१, रा. टिंबर मार्केट परिसर), अ‍ॅड. विवेक नाईकराव घाटगे (४५, सी वॉर्ड, शनिवार पेठ), अ‍ॅड. कुलदीप सुहास कोरगावकर (३०, रा. सी. वॉर्ड, शनिवार पेठ), अ‍ॅड. समीउल्ला महंमदइसाक पाटील (३०, सी वॉर्ड, शनिवार पेठ), अ‍ॅड. पांडुरंग बाबूराव दळवी (३४, डी वॉर्ड, तेली गल्ली, शुक्रवार पेठ) अशी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी रॉकेल कॅन, रॉकेलमध्ये भिजलेले कपडे जप्त केले.ताब्यात घेऊन सुटका केलेल्या वकिलांची नावेअ‍ॅड. प्रशांत चिटणीस (अध्यक्ष, कोल्हापूर बार असोसिएशन), अ‍ॅड. रवींद्र जानकर (सेके्रटरी, कोल्हापूर बार असोसिएशन), अ‍ॅड. शिवाजीराव राणे (माजी अध्यक्ष, कोल्हापूर बार असोसिएशन), अ‍ॅड. राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, अ‍ॅड. राजेंद्र पाटील, अ‍ॅड. सुनील रणदिवे, अ‍ॅड. बाबासाहेब वागरे, अ‍ॅड. उदयराज बडस्कर, अ‍ॅड. अजितकुमार गोडे, अ‍ॅड. संतोष तावदारे, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. व्ही. आर. पाटील, अ‍ॅड. के. व्ही. पाटील, अ‍ॅड. प्रकाश मोरे, अ‍ॅड. किशोर नाझरे, अ‍ॅड. सुशांत गुडाळकर, अ‍ॅड. नंदकिशोर पाटील, अ‍ॅड. मिलिंद शेडशाळे, अ‍ॅड. प्रकाश पाटील-सरुडकर, अ‍ॅड. संदीप चौगुले, अ‍ॅड. अशोक पाटील, अ‍ॅड. रमेश कांबळे-बोरगावकर, अ‍ॅड. सुभाष मगदूम, अ‍ॅड. डी. डी. देसाई, अ‍ॅड. योगेश साळोखे, अ‍ॅड. विक्रम बन्ने, अ‍ॅड. अंशुमन कोरे, अ‍ॅड. निशिकांत पाटोळे, अ‍ॅड. राजेंद्र पाटील, अ‍ॅड. निखिल शिराळकर, अ‍ॅड. शिवप्रसाद सांगवडेकर, अ‍ॅड. अनिरुद्ध कुलकर्णी, अ‍ॅड. दीपक पिंपळे, अ‍ॅड. गुरुप्रसाद पाटील.पोलिसांचाही गनिमी कावापक्षकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने पोलिसांनी न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांना शोधण्यासाठी पोलिसांनी वकिलांसह, न्यायालयीन कर्मचारी व बेलीफ अशी वेशभूषा केली होती. आंदोलकांची धरपकड करताना हा पोलिसांचाही गनिमी कावा दिसला.