शहरं
Join us  
Trending Stories
1
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
2
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
3
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
4
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
5
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
6
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
8
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
9
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
10
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
11
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
12
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
13
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
14
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
15
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
16
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
17
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
18
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
19
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
20
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...

फेसबुक हॅक करून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न, डाएटच्या प्राचार्यांची सतर्कता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 14:20 IST

रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्या जुन्या फेसबुक अकाऊंटवरुन हॅकरने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देफेसबुक हॅक करून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न, डाएटच्या प्राचार्यांची सतर्कतासायबर सेलने तातडीने दखल घेतल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले

रत्नागिरी : जुने फेसबुक खाते हॅक करून अनेकांना ह्यमाझे वडील आजारी आहेत. मी आयसीयूमध्ये आहे, मला तातडीने पन्नास हजार रुपये पाहिजेत, तीस हजार रुपये पाहिजेत, असा इंग्रजीमधून मेसेज पाठवून फसवणूक करू पाहणाऱ्या हॅकरचा हा खेळ वेळीच लक्षात आल्याने अनेकांची आर्थिक फसवणूक होताहोता टळली.

रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्या जुन्या फेसबुक अकाऊंटवरुन हॅकरने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.हा सारा फसवणुकीचा प्रकार २९ जून रोजी सकाळी घडला. डॉ. गजानन पाटील यांचे जुने फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक करुन त्यावरून अनेकांना माझे वडील आजारी आहेत, मी आय. सी. यू.मध्ये आहे, मला तातडीने पन्नास हजार रुपये पाहिजेत, तीस हजार रुपये पाहिजेत, असा इंग्रजीमधला मेसेज पाठविला होता.

सुमारे तासाभरात अनेकांना हा मेसेज गेल्याने संबंधित लोकही हैराण झाले. यावेळी काहींनी बँकेचा खाते नंबर मागितला. त्यावर हॅकरने गुगल पेचा अकाऊंट नंबर आणि आयएफएससी कोड नंबरही दिला. काहींनी त्याला फोनवरून संपर्कही केला. त्यावेळी तो इंग्रजीमध्ये बोलत होता. त्यामुळे काहींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.मात्र, डॉ. पाटील यांच्या एका मित्राने त्यांना फोन लावला व सर काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही आय. सी. यु.मध्ये आहात का? वडिलांची तब्बेत कशी आहे? असे विचारले. मात्र, हे प्रश्न ऐकताच काहीतरी गडबड असल्याचे डॉ. पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी अधिक माहिती घेतली असता, त्यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञाताने हॅक केल्याचे समजले.

त्यामुळे त्यांनी तातडीने रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानक, सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. बँकेलाही पत्र देऊन खाते तात्पुरते बंद केले. फेसबुकचे जुने खाते डीअ‍ॅक्टिव्ह केले आणि चालू फेसबुकवरून सर्वांना सावध करणारा संदेश पाठवला. सोशल मीडियावरून लोकांना सावधानतेचे आवाहन केले. तसेच वास्तवाची सर्वांना कल्पना दिली. डॉ. पाटील यांनी फेसबुक कंपनीकडेही याविषयीची तक्रार नोंदविली आहे.एक केंद्रप्रमुख हॅकरच्या या फसवणुकीला बळी पडले. त्यांनी तातडीने पैसे भरले होते. डॉ. पाटील यांचे काही स्नेही आणि आयटी सेलमधील काहींनी त्या फोनचा सुगावा लावला. यावेळी तो फोन नंबर ओडिसामधला असल्याचे समजले.

अकाऊंट डीअ‍ॅक्टिव्ह करूनही त्या तोतयाने ऑनलाईन मेसेंजरवरून परत संदेश पाठवायला सुरुवात केली होती. मात्र, डॉ. पाटील यांनी तातडीने केलेल्या तक्रारीमुळे आणि त्यांच्या आयटी सेलमधील तज्ज्ञांच्या कामगिरीमुळे फसवणुकीचा मोठा प्रकार रोखला गेला.

कोणीतरी माझ्या नावाने फेसबुकवर माझा फोटो वापरुन परिचित व्यक्ंितना किंवा मित्रांना फेसबुक मेसेंजरद्वारे संदेश पाठवून मी अडचणीत असल्याचे सांगून मोठी रक्कम मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. सद्यस्थितीत मी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्ट्राग्रामसारख्या कोणत्याही सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे ऑनलाईन वैयक्तिक संवाद अथवा चॅटिंग/मेसेजेस् अजिबात करत नाही. तरीही मला हा अनुभव आला. सर्वांनी प्रसारमाध्यमांचा सावधपणे वापर करावा. अनोळखी व्यक्तीसोबत आॅनलाईन आर्थिक व्यवहार करु नये.- डॉ. गजानन पाटील, प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी

टॅग्स :fraudधोकेबाजीonlineऑनलाइनRatnagiriरत्नागिरी