शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

पेयजलमधील अपहार दडपण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 27, 2014 00:14 IST

आमजाई व्हरवडेतील योजना : अधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता

आमजाई व्हरवडे : आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील पेयजल योजनेतील घोटाळा ‘लोकमत’ने उघडकीस आणला असून, काल १३ लाख ५० हजार ज्या अज्ञाताने ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावर भरले होते, त्याचा आज, बुधवारी शोध लागला. संजय शंकर जाधव या नावे बँक आॅफ इंडिया, कोल्हापूर शाहूपुरी शाखेतून ही रक्कम वर्ग झाल्याचे आज उघड झाले आहे.जाधव यांना ग्रामपंचायतीने २४ जून १४ रोजी धनादेश दिलाच कसा व जाधव याने ही रक्कम तातडीने वर्ग केलीच कशी, याचे गौडबंगाल काय? या सर्व प्रकरणात ग्रामसेवकापासून संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हात असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबधितांचे धाबे दणाणले आहेत. कालपासून हे प्रकरण दाबण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. आमजाई व्हरवडे येथील ४९ लाखांच्या पेयजल योजनेतील काम निकृष्ट व अर्धवट आहे. याबाबत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्याने हे प्रकरण बाहेर आले. या पेयजलचे बिल अदा करताना ग्रामसभा न घेता, तसेच कामाची पूर्तता झालेली नसताना मुख्य ठेकेदाराला बाजूला ठेवूनच ग्रामसेवक व काही पदाधिकाऱ्यांनी संगनमताने संजय जाधव यांच्या नावे धनादेश दिला. मात्र, कोेणत्याही कामाची रक्कम देताना मुख्य ठेकेदाराच्या नावे धनादेश देऊन रक्कम दिली जाते. मात्र, साडेतेरा लाखांचा अपहार करण्याच्या उद्देशानेच जाधव यांच्या नावे धनादेश दिल्याचे आता उघड झाले आहे. पेयजलचा पूर्ण रकमेचा धनादेश देताना कामाचा दर्जा व काम पूर्ण झाल्याचे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी व गटविकास अधिकाऱ्यांनी पडताळणी करणे जरूरीचे असते. मात्र, तसे न करता धनादेश दिल्याने शासकीय अधिकाऱ्यांचाही हात आहे काय? हे आता तपासणे गरजेचे आहे. दरम्यान, या १३ लाख ५० हजार रुपयांच्या घोटाळ्यावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी पेयजलचे अध्यक्ष व सचिव यांना जबाबदार धरले आहे. त्यांनीच हा धनादेश जाधव यांना दिल्याचा आरोप केला आहे, तर पेयजलचे सचिव व अध्यक्ष यांनी या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसून, आमच्या बोगस सह्या मारल्याचा आरोप केला. कारण याची सर्व कागदपत्रे ग्रामसेवकांच्या ताब्यात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)अविनाश सुभेदारांनी स्वत: लक्ष घालावे५० लाखांच्या कामात १३ लाखांचा अपहार उघडकीस आला आहे. जर हे प्रकरण दाबले गेले, तर जिल्ह्यात चुकीचा संदेश पोहोचण्यास वेळ लागणार नाही. प्रकरण दाबले गेले, तर भ्रष्टाचाराला पाठीशी घातल्याचा अर्थ होईल. त्यामुळे जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारवाई एवढी मोठी करा की, जिल्ह्यात पुन्हा शासकीय कामात भ्रष्टाचार करण्याचे धाडस होणार नाही.