शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

प्रत्येक तालुक्यांत क्रीडा संकुलासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवडणगे : कोल्हापूर जिल्हा हा कलेसाठी प्रसिद्ध आहे. खेळामध्येही आपला जिल्हा नंबर एक आहे. तो टिकविता आला पाहिजे. जिल्ह्यातच नव्हे, तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यावर आमचे लक्ष केंद्रित असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.दत्त समर्थ सांस्कृतिक भवन, पन्हाळा रोड, आंबेवाडी (ता. करवीर) येथे भारतीय जनता ...

लोकमत न्यूज नेटवर्कवडणगे : कोल्हापूर जिल्हा हा कलेसाठी प्रसिद्ध आहे. खेळामध्येही आपला जिल्हा नंबर एक आहे. तो टिकविता आला पाहिजे. जिल्ह्यातच नव्हे, तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यावर आमचे लक्ष केंद्रित असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.दत्त समर्थ सांस्कृतिक भवन, पन्हाळा रोड, आंबेवाडी (ता. करवीर) येथे भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) यांच्यावतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त खेलो भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय एकदिवसीय दिवस-रात्र कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक प्रमुख उपस्थित होते.चंद्रकांतदादा म्हणाले, कोणताही खेळ असो, त्यावर श्रद्धा असावी. खिलाडूवृत्तीने खेळ खेळले पाहिजेत. इनडोअर मॅटवर होणाºया स्पर्धेचे नियोजन सुरेख केलेले आहे. कबड्डी खेळासाठी व अशाप्रकारच्या स्पर्धांसाठी राज्य सरकारचे प्रोत्साहन कमी पडणार नाही. कबड्डीसारख्या खेळाचा दर्जा टिकविण्यासाठी जिल्ह्याबरोबरच तालुक्याच्या ठिकाणीही सर्व प्रकारच्या खेळांसाठी सर्वसोयीनियुक्त क्रीडासंकुल उभारण्याची इच्छा आहे. तशा सूचनाही लवकरच देत आहोत.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, शासनाच्या भरपूर सुविधा येत असतात. जे लोकांना अपेक्षित आहे, ते अशा स्पर्धांच्या माध्यमातून युवकांपर्यंत उपक्रम पोहोचत आहेत. पक्षाच्या माध्यमातून सर्व खेळाडंूना कीट देऊन जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे सामने पहिल्यांदाच भरत आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. क्रीडा क्षेत्रातसुद्धा पक्षाच्यावतीने काम करता यावे या हेतूने सामने भरविण्यात आले. कबड्डीसारख्या खेळाला ग्लॅमर मिळणे गरजेचे आहे.कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, के. एस. चौगले, अ‍ॅड. अनिल डाळ्या, अक्षय मोरे, अमोल जाधव, सुदर्शन पाटसकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत १३ संघांनी सहभाग घेतला आहे. सकाळच्या सत्रात राधानगरी बुल फायटर्स, इचलकरंजी मॅँचेस्टर, कागल किंग्ज यांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी घोडदौड केली. भा. ज. यु. मो.चे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अजय चौगले यांनी प्रास्ताविक, संदीप व्हरांबळे यांनी स्वागत केले. जिल्हा क्रीडा संघटक अशोक चौगले यांनी आभार मानले.