शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 11, 2014 00:22 IST

मोर्चावेळी वाहनांची तोडफोड : सनी पोवार मृत्यूप्रकरणी फरार आरोपींच्या अटकेची बहुजन अन्याय निवारण समितीची मागणी

कोल्हापूर : पेठवडगाव येथील जगदीश ऊर्फ सनी प्रकाश पोवार मृत्यूप्रकरणातील फरार संशयित आरोपी साहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील व पोलीस नाईक धनाजी पाटील यांना अटक न झाल्याच्या निषेधार्थ बहुजन अन्याय निवारण कृती समितीच्यावतीने आज, बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी अडविल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी आवारातील काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. कृती समितीच्या शिष्टमंडळाने संशयित आरोपींना चोवीस तासांच्या आता अटक करा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने यांना दिले. एस. टी. बसच्या काचा फोडून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी २३ आॅगस्टला वडगाव पोलिसांनी संशयित आरोपी सनी पोवार यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या अचानक पोटात दुखू लागल्याने सीपीआरमध्ये दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोवार याच्या मृत्यूचे पडसाद वडगावसह कोल्हापुरात उमटले. पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची फिर्याद त्याचा थोरला भाऊ जयदीप पोवार याने वडगाव पोलिसांत दिली. त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव पाटील, हवालदार बनन शिंदे, पोलीस नाईक धनाजी पाटील यांच्यावर खुनाचा गुन्हा (३०२) दाखल करण्यात आला तसेच या प्रकरणाचा गोपनीय तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सी. आय.डी) विभागाकडे देण्यात आला. घटना घडून १८ दिवस उलटले तरी संशयित आरोपींना अटक होत नाही, त्याच्या निषेधार्थ आज बहुजन अन्याय निवारण कृती समितीच्या सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाची तीव्रता पाहून पोलिसांची फौजच तैनात करण्यात आली होती. बिंदू चौकातून मोर्चास सुरुवात झाली. शिवाजी चौक, सीपीआर, दसरा चौक, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन मोर्चा धडकला. मोर्चामध्ये महिला व तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होता. पोलिसांनी प्रवेशद्वारासमोर अडविल्यावर संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पोलिसांचे कडे तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नेतेमंडळींनी मोर्चाला गालबोट लावू नका, असे आवाहन केल्याने कार्यकर्ते पुढे जायचे थांबले. यावेळी त्यांनी परिसरात लावलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या नंबरप्लेट फोडल्या तर शासकीय फलक फाडले. त्यानंतर काही मोजक्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी माने यांची भेट घेऊन त्यांना निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर बोलाविले. त्यानंतर जिल्हाधिकारी माने, निवासी उपजिल्हाधिकारी चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे आंदोलकांसमोर आले. अन्याय निवारण समितीचे निमंत्रक एल. जी. सनदी यांनी संशयित आरोपींना चोवीस तासांच्या आत अटक झाली पाहिजे. त्यांची नार्को स्टेट करावी, खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. ज्येष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. मृत सनी याचा भाऊ जयदीप याला सरकारी सेवेत घ्यावे, तसेच कुटुंबीयांना एक कोटींची नुकसानभरपाई द्यावी, वडगाव येथे सामाजिक अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करावा, आदी मागण्यांचे निवेदन दिले. माने यांनी फरार संशयित आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न करू, मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले. त्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलनकर्ते शांत झाले. मोर्चात प्रा. विश्वास देशमुख, जगन कराडे, वैभव कांबळे, दिलीप वायदंडे, नंदकुमार गोंधळी, लाला नाईक, प्रतापराव मधाळे, सचिन जाधव, पी. एस. चोपडे, सुभाष देसाई, दिगंबर संकट, सुभाष माने, अविनाश अंबपकर सहभागी झाले. (प्रतिनिधी)