शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

हल्ल्याची अफवा, पोलिसांची तारांबळ

By admin | Updated: January 24, 2016 00:54 IST

'अ‍ॅस्टर आधार'मध्ये मॉक ड्रील : अतिरेकी हल्ला रोखण्यास कोल्हापूर पोलीस सक्षम

कोल्हापूर : वेळ सायंकाळी साडेपाचची, पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात कामात व्यस्त होते. अचानक अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अंदाधुंद गोळीबार करीत तीन अतिरेकी घुसले असून, त्यांनी कर्मचाऱ्यांसह रुग्णांना व नातेवाइकांना ओलीस ठेवल्याचा निनावी दूरध्वनी पोलीस कंट्रोल रुमला आला. कंट्रोलने त्वरित ही माहिती बॉम्बशोध पथकासह शहरातील पोलीस ठाण्यांना दिली. या संदेशाने अधिकाऱ्यांसह पोलिसांची तारांबळ उडाली. अवघ्या पंधरा मिनिटांत सशस्त्र पोलिसांची फौज घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी हॉस्पिटल परिसराला घेराव घातला. मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून जलद कृती दलाचे जवान व पोलिसांनी प्रवेश केला. आतमध्ये तोंडाला माकड टोप्या घालून फिरणारे तीन अतिरेकी नजरेस पडले. यावेळी पोलीस व अतिरेक्यांत झालेल्या गोळीबारामध्ये एक अतिरेकी ठार झाला, तर दोघे शरण आले. हा थरार सुमारे दीड तास सुरू होता. आॅपरेशन यशस्वी झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी ही रंगीत तालीम असल्याचे सांगितले. त्यानंतर डॉक्टर, कर्मचारी, रुग्ण व नातेवाइकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अतिरेकी हल्ल्यांंच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील संपूर्ण सुरक्षा यंत्रणेला अतिदक्षतेच्या सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पोलीस यंत्रणेची सतर्कता पडताळण्यासाठी शहरात रंगीत तालीम घेतली. अ‍ॅस्टर आधार येथे अतिरेकी हल्ला झाल्याचा निनावी दूरध्वनी कंट्रोल रुमला आला. त्यानंतर तत्काळ शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, क्राइम ब्रँच, बॉम्बशोधपथक, राज्य राखीव दल, स्पेशल कमांडर, जलद कृती दलाचे जवान, पोलीस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचारी, बिट मार्शल, अग्निशामक दल, रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे पथक हॉस्पिटल परिसरात पोहोचले. माकड टोप्या घातलेले तिघे अतिरेकी हातांमध्ये रोखलेल्या बंदुका घेऊन फिरत होते. काही क्षणांत अतिरेक्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये एक अतिरेकी ठार झाला; तर अन्य दोघे शरण आले. बाहेरील नागरिक आजूबाजूला लपूनछपून हा सर्व थरार पाहत होते. आॅपरेशन यशस्वी झाल्यानंतर शहर पोलीस उपअधीक्षक राणे यांनी पोलीस अधीक्षक देशपांडे यांना कॉल दिला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास घेतला. या मॉक ड्रीलमध्ये आॅपरेशनमध्ये पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, अनिल देशमुख, अमृत देशमुख, अरविंद चौधरी, जलद कृती दल, जवळपास ११७ पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी) गोळीबाराचा बनाव हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. त्यामध्ये एक अतिरेकी ठार, तर दोघे शरण आले. हा संपूर्ण प्रसंग चित्रपटातील दृश्याप्रमाणे रंगवण्यात आला. आॅपरेशनमध्ये गोळीबार व नकली अतिरेकी घुसल्याचा बनाव करण्यात आला होता. तसेच हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास पूर्वकल्पना देऊन आॅपरेशन राबविण्यात आले होते. ...आणि सुटकेचा नि:श्वास अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटल परिसराला पोलिसांनी घातलेला सशस्त्र घेराव आणि त्यांची घालमेल पाहून काहीतरी घडल्याची जाणीव परिसरातील रहिवासी नागरिकांना झाली. त्यांनी कानोसा घेतला असता अतिरेकी हल्ला झाल्याचे समजताच त्यांना धडकीच बसली. दीड तास आॅपरेशन सुरूहोते. आॅपरेशनच्या समाप्तीनंतर मात्र पोलिसांनी ही रंगीत तालीम असल्याचे सांगितल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.