शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्रनगर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By admin | Updated: March 11, 2016 01:08 IST

संशयिताचा शोध सुरू : अपहरण करून केले कृत्य

 कोल्हापूर : साफसफाईचे काम देतो, असा बहाणा करून राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि. ९) रात्री मोरेवाडी-कंदलगाव चित्रनगरीजवळील माळरानावर घडली. याबाबतची फिर्याद मुलीच्या आईने राजारामपुरी पोलिसांत गुरुवारी दिली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात अपहरण, बलात्कार व धमकीचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला असून, संशयिताचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, बुधवारी सायंकाळी राजेंद्रनगर झोपडपट्टी येथे हा अज्ञात इसम साफसफाईचे काम देतो, असे सांगून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून फिरत होता त्यावेळी त्या अल्पवयीन मुलीची आई, ती मुलगी व तिचा नातेवाईक असे तिघेजण दारात थांबले होते. तो अज्ञात इसम त्यांच्याजवळ आला त्याने ‘साफसफाईच्या कामाला तासाला तीनशे रुपये देतो’ असे सांगितले. त्यावर या तिघांनी याला होकार दिला. त्या अज्ञाताने अल्पवयीन मुलीला व तिच्या एका नातेवाईकाला या दोघांना दुचाकीवरून सोडून येतो, असे तिच्या आईला सांगून तो अज्ञात तेथून निघून गेला. बऱ्याचवेळ तो अज्ञात आला नसल्याने अखेर तिच्या आईने हा प्रकार राजेंद्रनगर झोपडपट्टीतील नागरिकांना सांगितला. त्यानंतर तिची आई, अन्य नातेवाईक आणि नागरिक या परिसरात दोघांचा शोधाशोध करू लागले व ते राजारामपुरी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी हा प्रकार पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या कानावर घातला. तत्काळ पोलीस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे, सहाय्यक फौजदार राजू वरक यांच्यासह पोलिसांनी राजेंद्रनगर, मोरेवाडीसह कंदलगांव, चित्रनगरी पिंजून काढत असताना रात्री ती अल्पवयीन मुलगी आर. के. नगर येथून राजेंद्रनगरकडे रडत-रडत चालत येत असल्याचे दिसले. त्यानंतर तिला पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी तिच्या आईला फोनवरून मुलगी सापडली असल्याचे सांगून पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले.पोलिस ठाण्यात या अल्पवयीन मुलीने ‘पहिल्यांदा त्या अनोळखी इसमाने राजेंद्रनगर येथूनच जवळ असलेल्या एका इमारतीजवळ दोघांना आणले. या इमारतीची साफसफाई करायची आहे, असे सांगून याच इमारतीमधील एका महिलेकडून साफसफाई करण्यासाठी खराटा मागून आणून मला दिला. त्यानंतर पुन्हा फरशी साफ करायची आहे सांगून फिनेल आणायचे आहे, असे सांगून मला दुचाकीवरून तेथून नेले. चित्रनगरी परिसरातील एका माळरानावर ‘माझ्या अंगाशी झोंबाझोंबी करून अत्याचार केला, असे पोलिसांना व आईला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी बुधवारी रात्री सीपीआरमध्ये आणले. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे करत आहेत.खाकी रंगाची टोपी अन् विनानंबर प्लेट दुचाकी...त्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेल्या अज्ञाताचे वय अंदाजे ४२ ते ४५ च्या दरम्यान आहे. त्याने डोक्यावर खाकी रंगाची गोल टोपी परिधान केली होती. उंची पाच फूट पाच इंच असून, त्याच्याकडे असलेल्या दुचाकीला नंबर नसल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.