शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अटल चषक फुटबॉल स्पर्धा : ‘फुलेवाडी’ने ‘प्रॅक्टिस’ला बरोबरीत रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:04 IST

अटीतटीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ ला १-१ असे बरोबरीत रोखले.

ठळक मुद्देअटल चषक फुटबॉल स्पर्धा ‘फुलेवाडी’ने ‘प्रॅक्टिस’ला बरोबरीत रोखले

कोल्हापूर : अटीतटीच्या लढतीत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने अटल चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ ला १-१ असे बरोबरीत रोखले.शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत रविवारी या दोन तुल्यबळ संघात साखळी फेरीतील सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून ‘प्रॅक्टिस’कडून डेव्हीड ओपेरा, राहुल पाटील, इंद्रजित चौगुले, कैलास पाटील, सागर चिले यांनी फुलेवाडी च्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारली.त्यात ४ थ्या मिनिटास ‘प्रॅक्टिस’कडून पीटर सीनने गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ‘फुलेवाडी’कडून संकेत वेसणेकर, संकेत साळोखे, अरबाज पेंढारी, रोहित मंडलिक, मंगेश दिवसे, अक्षय मंडलिक यांनीही तितक्याच जोरदारपणे आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. १६ व्या मिनिटाला ‘फुलेवाडी’कडून संकेत वेसणेकर याने मिळालेल्या संधीवर गोल करीत संघाला १-१ असे बरोबरीत आणले.

उत्तरार्धात दोन्ही संघांनी एकमेकांवर आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. ‘प्रॅक्टिस’कडून डेव्हीड ओपेरा, कैलास पाटील, इंद्रजित चौगुले यांनी आक्रमणाची धार वाढवीत फुलेवाडी संघावर आघाडी मिळविण्याचा प्रयत्न केला; मात्र, सजग गोलरक्षक जिगर राठोडने त्यांचे गोल करण्याचे मनसुबे उधळून लावले.

सामन्याच्या जादा वेळेत फुलेवाडी संघाच्या गोलक्षेत्रात अरबाज पेंढारीने चेंडू अवैधरीत्या हाताळला. त्याबद्दल मुख्य पंच सुनील पोवार यांनी ‘प्रॅक्टिस’ संघास पेनल्टी बहाल केली. त्यावर गोल करून ‘प्रॅक्टिस’ संघ आघाडी घेईल व विजयी होईल, असा कयास फुटबॉलप्रेमींना होता; मात्र, प्रत्यक्षात ‘प्रॅक्टिस’च्या डेव्हीड ओपेराने मारलेला फटका फुलेवाडीचा गोलरक्षक जिगर राठोडने डावीकडे झेपावत बाहेर काढला; त्यामुळे आयत्याच गोल करण्याच्या संधीसह ‘प्रॅक्टिस क्लब’ विजयापासून दूर राहिला; त्यामुळे सामना १-१ असा बरोबरीत राहिला.

 

 

टॅग्स :Footballफुटबॉलkolhapurकोल्हापूर